शेतकरी आणि शेती म्हटले म्हणजे संकटांची मालिका एकामागून एक झेलणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तोंडात घास आला की काहीतरी नैसर्गिक संकट येते आणि आलेला घास हिरावून नेते.
परंतु काही अनैसर्गिक संकट देखील शेतकऱ्याला तसेच त्रासदायक ठरतात. या मधील सगळ्यात मोठे अनैसर्गिक संकट म्हणजे वीजपुरवठा हे होय. शेतामध्ये असलेल्या विहिरीला पाणी देखील असते, शेतामध्ये पीक डौलाने उभी असते परंतु विजेच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे वेळेवर पिकाला पाणीपुरवठा करता येत नाही व पिके वाळतात.
याचे प्रत्यंतर सध्या येवला तालुक्यातील ठाणगाव येथे आले. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, ठाणगाव येथील सागर शेळके व त्यांचे भाऊ मिळून चार एकर जमीन आहे. या जमिनीतील दीड एकर क्षेत्रांमध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली होती. दीड एकर वर सव्वा लाख रुपये खर्च करून कांद्याचे पीक खूप चांगले बहरत होते.
दहा ते बारा वेळेस त्या कांद्यावर कीटकनाशकांची फवारणी देखील केली गेली होती. परंतु विजेचे कायम असलेल्या समस्येने या शेतकऱ्याचा अपेक्षांचा घात केला. जवळ जवळ या परिसरामध्ये मागच्या एक महिनाभरापासून एकच तास विजेचा पुरवठा होत आहे तोही रात्री होत आहे. या एक तासा मध्ये कांद्याला पुरेसं पाणी देता येत नसल्याची खंत सागर शेळके यांनी व्यक्त केली. विहिरीला भरपूर पाणी आहे परंतु वीज नसल्यामुळे हातचे पीक डोळ्यादेखत वाळल्याने कांद्याला आग लावायची वेळ त्यांच्यावर आली.
सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढल्यानेपिकांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे. परंतु एकच तास पुरवठा असल्याने वेळेवर पाणी देता न आल्याने कांद्याची वाढ झाली नाही उन्हामुळे कांदा पीक वाळू लागले.
त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांदा पिकाला हाताने आग लावताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. उभ्या पिकाची राखरांगोळी तर सागर यांनी केलीच परंतु झालेल्या पिकांना गरज देखील करून टाकला. या सगळ्या परिस्थितीला महावितरण जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: 13 April 2022, 11:43 IST