कृषी दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात किल्ले रायगड वरून केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शेतकरी किल्ले रायगडावर आले होते.
यावेळी राजू शेट्टी यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले की, राज्यकर्त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील बेगडी प्रेम आहे. किल्ले रायगडावर राजसदर, होळीचा माळ तसेच समाधी स्थळावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, शेतकऱ्यांसाठीची निती याची उदाहरण देत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
राजू शेट्टी म्हणाले राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडे असल्याचे दिसून येत आहे. दहा महिन्यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. सरकार शेतक-यांच्या धोरणांच्या बाबतीत फक्त बैठकीचा फार्स करते.
जुलैमध्ये साखर विक्रीचा कोटा वाढवला, केंद्र सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात जुन्या योजनांचे अनुदान, कृषी साहित्य वाटप अथवा शासकीय योजनांची जत्रा भरवली जात असून त्यातून शेतकरी प्रेम दाखविले जात आहे. शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतक-यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
पहिली कर्जमाफी, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी -बियाणे ,अनुदान देणे. गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी, बंधारे, विहीरी, शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिल्या.
संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च, सरकारला मिळणारा कर, शेतक-यांना मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींची असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच स्वाभिमानीचे पदाधिकारी अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी रायगड येथे सांगितले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, शिंदे सरकारचा निर्णय...
शेतकऱ्यांसह पशुखाद्य उत्पादक कंपनीचा समितीत समावेश, आता तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडणार का?
जगातील सगळ्यात महागडी गाय भारताची, किंमत १४ लाख ४० हजार डॉलर...
Published on: 03 July 2023, 10:43 IST