News

सध्या कांद्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक समस्यांच्या खाईत लोटला गेला आहे. प्रति किलोमागे पंधरा ते वीस रुपयांच्या दरम्यानकांदा उत्पादनासाठी खर्च येतो मात्र सध्यापाच ते सहा रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

Updated on 17 May, 2022 12:28 PM IST

 सध्या कांद्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक समस्यांच्या खाईत लोटला गेला आहे. प्रति किलोमागे पंधरा ते वीस रुपयांच्या दरम्यानकांदा उत्पादनासाठी खर्च येतो मात्र सध्यापाच ते सहा रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

परंतु यात एक डोके सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उप बाजारांमध्येकांद्याला चक्क प्रतिकिलो एक रुपये भाव मिळाला आहे.प्रति किलो एक रुपये भाव मिळाला चा धक्का सहन न झाल्याने संबंधित शेतकरी भरत जाधव(रा. गुजरवाडी,  श्रीरामपूर) या शेतकऱ्याने बाजार समिती आवारातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार मध्ये रविवारी गुजरवाडी येथील शेतकरी भरत जाधव  याकांदा बाजारात विक्रीसाठी आणला.परंतु रविवारी लिलावाचा अधिकृत दिवस नव्हता. टाकळीभान उपबाजार मध्ये मंगळवार व शुक्रवारी कांद्याचे लिलाव होतात असे असतानाही जाधव यांच्या आग्रहास्तव एका व्यापाऱ्याने कांदा घेण्यास सहमती दर्शवली.

जाधव यांनी जो कांदा विक्रीसाठी आणला होता त्यातील एक कांद्याची गोणी फोडली असता तो माल 'नो बीट' झाल्यामुळे त्याला प्रति किलो एक रुपया भाव देऊ केला होता. बाकीचे आडतीवरील लीलाव मंगळवारी होणार होते मात्र एका आडती वरील कांदा नो बिट झाल्याने हबकून जाऊन जाधव यांनी काही वेळाने विषारी औषध प्राशन केले. नंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करून तातडीने या त्यांना साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 कांद्यापेक्षा गोणीचा खर्च जास्त

सध्या एक नंबर कांद्याला देखील व्यवस्थित भाव मिळत नाही.चांगला कांदा चाळीत भरून उरलेला कांदाशेतकरी काही दोन पैसे हातात मिळतील या अपेक्षेने विक्रीसाठी आणतात.तो कांदा भरण्यासाठी ची गोणी लागते त्या गोणी ची किंमत 18 ते 20 रुपये आहे.

परत वरून आणण्याचा वाहतूक खर्च व मजुरी ही वेगळीच लागते. परंतु जर शेतकऱ्याला असाच एक रुपये दोन रुपये प्रति किलो भाव मिळाला तर शेतकरी खचून जातात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:या राज्यात कांद्याला महाराष्ट्रापेक्षा जास्त भाव मिळतोय, बघा कोणती आहेत ही राज्ये

नक्की वाचा:बंधुंनो सावधान! जर तुम्ही कुणाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची प्रत देत असाल तर निघू शकते तुमच्या नावाने परस्पर लोन

नक्की वाचा:महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन केरळ आणि बिहारच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

English Summary: farmer attempt to suicide due to so decrease onion rate in market
Published on: 17 May 2022, 12:28 IST