अतिवृष्टी,सततचे ढगाळ हवामान, अवकाळी पावसामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून रासायनिक खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने रासायनिक खतांच्या किमतीत पूर्ण वाढ पाहायला मिळत आहे.या रासायनिक खतांचा विचार केला तर पोट्याश च्या एका बॅग मागे सातशे रुपये पर्यंत वाढण्याची माहिती आहे.
पोट्याश याची किंमत वाढल्यामुळे इतर खतांच्या किंमतीमध्ये देखील देखील दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत वाढ झालेली पाहायला मिळत आहेत. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सहाजिकच शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होणार असून त्याची झळशेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. त्यामध्ये युरिया आणि डीएपी हे दोन खते सोडली तर इतर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये दोनशे रुपयांपासून ते सातशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे
यामागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे की कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ आणि कंपन्यांच्या आयात खर्चात वाढ झाल्यामुळे रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोना,तसेच दुष्काळ आणि या वर्षी पडलेला अतिरिक्त पाऊस यामुळे आधी शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ म्हणजे शेतकऱ्याची पुरती कंबरडे मोडणारी ठरणार आहे.
Published on: 12 January 2022, 06:04 IST