गेल्या काही दिवसात शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई चे दावे दाखल झाले होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम जमा केली जात न्हवती. परंतु ज्यांचे दावे दाखल झाले होते त्यांना लवकरच मदत मिळणार असून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. १ हजार १६८ अपघाती शेतकरी तसेच १७ शेतकरी अपंग झाले आहेत त्या शेतकऱ्यांना शेतकरी अपघात विमा योजनेमधून लवकरच मदत दिली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे की विम्याच्या रकमा ताबडतोब शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा कराव्यात.
कशामुळे झाली होती योजना खंडीत?
१ डिसेंबर २०१६ रोजी पासून शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबविण्यात आलेली होती. जर शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू तर अपंगत्व आले आहे त्यांना मदतीची रक्कम दिली जाणार आहे. डिसेंबर २०२० ते ७ एप्रिल या कालावधीमध्ये या योजनेचा करार संपला होता त्यामुळे ही योजना खंडित केली होती. मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दावे स्वीकारणे चालू होते परंतु त्यांच्या बँक खात्यावर कोणात्याही प्रकारची प्रत्यक्षपणे रक्कम जमा केली जात न्हवती. मात्र आता पुन्हा करार झाला असून योजना सुरू झाली आहे.
असे आहे मदतीचे स्वरुप :-
ज्या कालावधीमध्ये करार संपल्यामुळे ही योजना खंडित करण्यात आली होती त्या दरम्यान १ हजार १६८ शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू तर १७ शेतकऱ्यांना अपंगत्व आले होते जे की त्यांच्या कुटुंबियानी हे दावे कृषी विभागाकडे दाखल केले होते. अपघातात जर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यास २ लाख रुपये तर ज्या शेतकऱ्याला अपंगत्व आले आहे त्या शेतकऱ्यास १ लाख रुपये मदतीचे या योजनेचे स्वरूप आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना योजनेनुसार २३ कोटी ३६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना १७ लाख रुपये मदत मिळणार आहे.
अपघात विमा मिळण्याची प्रक्रिया :-
अपघात झालेल्या शेतकऱ्याचा पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र तसेच ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्या शेतकऱ्याचा वारसा प्रमाणपत्र तसेच वारसा अर्जदार. एवढ्या सर्व प्रकारची कागदपत्रे कृषी विभागात जमा करावी लागणार आहेत. त्यानंतर कृषी विभाग ज्या विमा कंपन्यांची निवड केली आहे त्या कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता केली जाते आणि शेवटी सर्व प्रकारची चौकशी होऊन त्या शेतकऱ्यास किंवा कुटुंबाला विमा रक्कम दिली जाते.
Published on: 11 March 2022, 01:31 IST