1. बातम्या

पान मळ्यांची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतीय वरदान, कशी करायची शेती? जाणून घ्या..

राज्यातील अनेक शेतकरी हे शेतीमध्ये केवळ पारंपरिक पिके घेऊन शेती करतात. मात्र यामध्ये हवेतसे उत्पन्न त्यांना मिळत नाही. यामुळे वेगळे प्रयोग करणे देखील फायदेशीर ठरते. असे असताना पान मळ्यांची शेती सध्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देत आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farm Farming

Farm Farming

राज्यातील अनेक शेतकरी हे शेतीमध्ये केवळ पारंपरिक पिके घेऊन शेती करतात. मात्र यामध्ये हवेतसे उत्पन्न त्यांना मिळत नाही. यामुळे वेगळे प्रयोग करणे देखील फायदेशीर ठरते. असे असताना पान मळ्यांची शेती सध्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देत आहे. यामुळे अनेक शेतकरी याकडे वळाले आहेत. यामधून त्यांनी एक वेगळा संदेश देखील इतर शेतकऱ्यांना दिला आहे. या पिकासाठी सुपीक मातीच योग्य असते. या वेलची योग्य निगा राखणे देखील गरजेचे असते. अनेक शेतकऱ्यांनी याची शेती देखील अजून बघितली नाही. यामुळे याकडे वळण्याचा कल कमीच आहे.

यासाठी भुसभूशीत जमिन क्षेत्रावर वाढ चांगली होते. पिकाची वाढ जोमात होण्यासाठी पाणी पुरवठा, योग्य वातावरण आणि ज्या ठिकाणी 200 ते 450 सेंमी पावसाची वार्षिक सरासरी आहे त्या ठिकाणी सुपारी पानांची वाढ होते. यामुळे याची लागवड करत असताना योग्य रानाची निवड करणे आवश्यक आहे. उष्णकटिबंधीय हवामानात उंच जमिनीवर तसेच पाणथळ भागात याची लागवड करता येते. याला लागवड केल्यानंतर किंवा आठवड्यातून एकदा पाणी देणे गरजेचे आहे. यामुळे वेलाचा समतोल राखला जातो. तसेच 15 ते 20 सेंटीमीटर वाढ झाली की पानाच्या वेलीला छताचा अधार देणे गरजेचे आहे.

छताचा आधार दिला तरच याची योग्य वाढ होणार आहे. तसेच आठवड्यातून एकदा पानाची बारीक पाहणी करणे गरजेचे आहे, थोडाजरी रोग यावे आला तर त्याचा प्रसार सगळ्या वेलांवर होण्याची शक्यता आहे. पानाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. यामध्ये देसावरी, बांगला, कापूरी, मिथा आणि सांची यांचा समावेश आहे. कापुरी आणि सांची प्रामुख्याने द्वीपकल्पीय पीक भारतात केले जातात, तर बांगला आणि देसवारी सामान्यत: उत्तर भारतात घेतले जातात. पश्चिम बंगालमध्ये व्यवसायिक पातळीवर मिठाईसाठी ही पाने पिकवली जातात. त्याठिकाणी याला मोठी मागणी देखील असते.

हे एक भांडवल देणारे आणि नगदी पीक आहे. यामुळे यामधून तुम्हाला चांगले उत्पन्न देखील मिळेल. काही सणासुदीच्या काळात या पानांना मोठी मागणी असते. यामुळे त्यापद्धतीने त्याचा बहार घेणे आवश्यक आहे. या पिकाच्या वाढीसाठी किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस तर जास्तीत जास्त 40 अंश पर्यंत तापमान सहन करु शकते. उष्ण आणि कोरडी हवा यासाठी धोकादायक आहे. यामुळे याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. याची व्यवस्थित तोडणी झाली तर पुढील पानांची वाढ देखील चांगली होते.

English Summary: Farm Farming is a boon for farmers, how to do farming? Find out .. Published on: 20 January 2022, 11:41 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters