सध्या स्वदेशी कार कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या थारची 'डिमांड' चांगलीच वाढली आहे. या रुबाबदार कारसाठी अनेक शहरांमध्ये एक-एक वर्षांचे वेटिंग आहे. किंमत जास्त असली तरी थारचा थाटच वेगळा आहे.
अशा या हाय पावरफुल कारचा पुणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्याने चक्क शेतीची नागंरट करण्यासाठी वापर केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर गावातील शेतकऱ्याचा आहे. अनिल मधुकर तोंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे त्यांची चर्चा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुरू आहे.
आता शुगर फ्री तांदूळ विकसित होणार, शास्त्रज्ञांचे काम सुरू
काही दिवसांपूर्वीच थार खरेदी केली. या पाॅवरफुल कारच्या मदतीने शेतातील नांगरणी केल्याने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक शेतकरी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करत असतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका शेतकऱ्याने गाईला थेट गाडीत बसवून घरी आणले होते. तसेच बैलगाडा शर्यतीसाठी देखील गाडीत नेले होते.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना 1500 कोटींच्या मदतीची घोषणा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देणार..
८५० रुपयांची कापसाची बॅग तब्बल 2300 रुपयांना, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार आला समोर...
लंपी रोगामुळे पांगरा येथे अनेक जनावरे दगावली,शासकीय पशुसंवर्धन खात्याच्या डाॅक्टरांचे दूर्लक्ष
Published on: 13 June 2023, 02:24 IST