पारंपारिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना अनेकदा पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. काहीवेळा लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही. तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होवुन बागायती शेती करता येत नाही. अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागते. पण कमी पावसाच्या ठिकाणी देखील शेतकरी नव नवीन प्रयोग करत आहेत. त्यातीलच एक यशस्वी प्रयोग म्हणजे ड्रॅगन फ्रुटची शेती. महाराष्ट्रात आता बरेच शेतकरी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळताना दिसत आहे.
ड्रॅगन फ्रुटचं उत्पादन -
योग्य प्रकारचं पीक येण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पाण्याची गरज असते. पण ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन दुष्काळी भागात कमी पाण्यात घेता येते. त्याचबरोबर जमिनीचा दर्जा फारसा चांगला नसला तरी या फळाची चांगली वाढ होऊ शकते. केंद्र आणि राज्य सरकारही देखील ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला चालना देत आहेत. या पिकाच्या लागवडीमुळं शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहेत. ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग जातीतील एक वेलवर्गीय पीक असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारच्या वन्य प्राण्यांपासून नुकसान होत नाही. ड्रॅगन फ्रुट चे मूळ उगमस्थान पाहिले दक्षिण अमेरिकेतले आहे. परंतु आता भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात देखील याचे उत्पादन घेतले जात आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड करताना झाडाला आधार देण्यासाठी खांबांची उभारणी करावी लागते. एक झाड सरासरी 22 ते 25 वर्षे जगत असल्यामुळे खांबांचा एकदा खर्च करून दीर्घकाळापर्यंत याचे उत्पादन मिळते. ड्रॅगन फ्रुटची लागवड 50 सेमी पाऊस आणि 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात सहज करता येते. याच्या लागवडीसाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. त्यामुळे शेडचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून फळांची चांगली लागवड करता येईल. ड्रॅगन फ्रुटला जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये फळे येण्यास सूरवात होते व एका झाडाला 40 ते 100 फळे लागतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात तीन महिने पाण्याशिवाय देखील हे पीक तग धरू शकते. ड्रॅगन फ्रुटची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. त्यामुळे शातकऱ्यांना चांगला नफा मिळतो.
आरोग्यासाठी फायदेशीर -
ड्रॅगन फ्रुट खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदा होतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये फॅट आणि प्रोटिनचे प्रमाणही खूप जास्त असते, त्यामुळे सांधेदुखीचा आजारही दूर होतो. ड्रॅगन फ्रुट हृदयाशी संबंधित आजारही दूर करू शकते. ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते. या फळापासुन शरबत, जाम, सिरप, आइस्क्रीम, योगर्ट, मुरंबा, जेली, कँडी, पेस्ट्री ह्या गोष्टी बनविण्यासाठी वापरले जाते. या फळापासुन विटामीन सी,बी,कॅल्शियम, पोटॅशियम,लोह,फायबर प्रोटीनयुक्त अशी जीवनसत्वे मिळतात. ड्रॅगन फ्रुटमुळे डायबेटीज, हृदयविकार ,कॅन्सर, पोटाचे आजार , कोलेस्ट्रॉल नियंत्रण, लठ्ठपणा आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
Published on: 07 October 2023, 03:04 IST