News

देशात या वर्षी कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे सांगितले जात आहे, राज्यात देखील खानदेश समवेतच मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रात घट नमूद करण्यात आली आहे. कापसाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय घट व अवकाळी पावसामुळे कापसावर आलेले रोगांचे सावट यामुळे कापसाच्या उत्पादनात यावर्षी घट नमूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीने चांगलाच जोर पकडला आहे त्यामुळे याचा परिणाम स्थानिक बाजारावर देखील पडत आहे. म्हणूनच कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाल्याचे चित्रे डोळ्याला नजरेस पडलेत.

Updated on 19 January, 2022 9:01 PM IST

देशात या वर्षी कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे सांगितले जात आहे, राज्यात देखील खानदेश समवेतच मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रात घट नमूद करण्यात आली आहे. कापसाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय घट व अवकाळी पावसामुळे कापसावर आलेले रोगांचे सावट यामुळे कापसाच्या उत्पादनात यावर्षी घट नमूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीने चांगलाच जोर पकडला आहे त्यामुळे याचा परिणाम स्थानिक बाजारावर देखील पडत आहे. म्हणूनच कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाल्याचे चित्रे डोळ्याला नजरेस पडलेत.

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला सुमारे दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता. मध्यंतरी कापसाच्या बाजार भावात घसरण नोंदविण्यात आली होती मात्र नंतर भाव पुन्हा एकदा झळकताना नजरेस पडलेत. यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगला बाजारभाव प्राप्त झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. जिल्ह्यात सध्या फरदड कापसाला देखील चांगला बाजारभाव मिळत असल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हात खर्चासाठी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या मध्यात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी, कापसाचे फरदड उत्पादन घेतल्यामुळे कापसावर बोंड आळीचे सावट नजरेस पडते तसेच यामुळे पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर देखील बोंड आळी आक्रमण करू शकते, शिवाय यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका हा कायम असतो त्यामुळे कपाशीचे फरदड टाळावे असा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात.

कापसाच्या पिकाला गेल्या अनेक वर्षापासून बाजारपेठेत चांगला दर प्राप्त होत नव्हता, तसेच कापसाचे पीक हे खूप खर्चिक असते या पिकासाठी मजुरांची देखील जास्त आवश्यकता भासत असते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी कापसाच्या क्षेत्रात जिल्ह्यात लक्षणीय घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्यात बघायला मिळाली त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट नमुद करण्यात आली. तसेच यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी असल्याने कापसाला चांगला बाजारभाव प्राप्त झाला. यावर्षी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे, कापसाला गेल्या अनेक वर्षापासून पाच हजार रुपये पर्यंतचा बाजार भाव मिळत असे, परंतु यावर्षी बाजार भावात विक्रमी वाढ बघायला मिळत आहे. फरदड कापसाला देखील या वर्षी आठ ते नऊ हजार रुपया पर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे. 

मात्र असे असले तरी, फरदड उत्पादनामुळे आगामी हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्याने शिवाय यामुळे जमीन नापीक होत असल्याने कृषी विभागाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कापसाचे पीक उपटण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकरी यांच्या मते, फरदड कापसाचे वजन देखील कमी होत असते त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या फरदड उत्पादनाच्या मोहोजाळ्यात अडकून न पडता कापूस पिक नष्ट करावे आणि इतर पिकांची लागवड करावी.

English Summary: fardad cotton prices increased
Published on: 19 January 2022, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)