ऐन हंगामातही द्राक्षांच्या दरात घसरण ; शेतकरी चिंतेत

23 March 2021 09:06 PM By: भरत भास्कर जाधव
द्राक्षांच्या दरात घसरण

द्राक्षांच्या दरात घसरण

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामात ६५-७० टक्के बागांतील फळांची काढणी पूर्ण झाली आहे. हंगाम आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. परंतु दरात सातत्याने घरसण सुरूच आहे. सध्या चार किलोचा दर १५० ते २२५ रुपयांपर्यंत असलेला दर १३० ते १४० रुपयांवर आला आहे.

तर निर्यातक्षम द्राक्षाचे दर २२० ते २६० रुपयांवरून १८० ते २२० रुपयांवर आला आहे.इंधनदरवाढीचा थेट फटकाही शेतकऱ्यांना बसतो आहे. दरातील घसरणीची चिंता कायम आहे. चालू हंगामातील देणीच भागत नाहीत मग पुढील हंगामाच्या स्वप्नांचा तर चक्काचूर झाला आहे.यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीपासून जोमाने सुरू झाला. अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लॉकडाउनच्या अफवा, निर्यातीवर आलेल्या मर्यादेमुळे यंदा द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्यांना शोधायची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी दर न ठरवता केवळ बागांतील माल घालवण्याला प्राधान्य दिले.

 

यंदाचा अवकाळी, अतिवृष्टी, धुके, कोरोना संकट, निर्यातीवरील अनुदान कपात, सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकार आणि प्रशासनाकडून लॉकडाउनची दाखवली जाणारी भीती द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आली.सांगली जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्‍टरवर द्राक्ष बागांची लागण आहे. सद्य:स्थितीत ५० टक्के बागांची विक्री झाली आहे, तर यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे २५ टक्के माल खराब झाला आहे. उर्वरित पंचवीस टक्के क्षेत्रातील बागा शिल्लक आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नादात, उत्पादन खर्च दुप्पट तर झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सरकारने सांगितले. पण

पण  प्रत्यक्षात त्याचा उत्पादन खर्च दुप्पट करून जे होते ते उत्पन्नदेखील हातातून जात आहे.“यंदा द्राक्ष हंगामावर पहिल्यापासून संकट ओढावले. त्यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट आली आहे. त्यातच कोरोनाची भीती निर्माण झाल्याने लॉकडाउनची भीती शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून दाखवली जात असल्याने दरात घसरण झाली आहे.” - विनायक पाटील, उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव.

grape prices द्राक्षांच्या दरात घसरण द्राक्षांचे दर grape prices down
English Summary: Falling grape prices even during the Ain season, farmers worried

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.