News

बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्यांना चांगला दर मिळेल अशी आशा आहे.

Updated on 20 October, 2023 2:30 PM IST

Maharashtra Onion News : ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केल्यामुळे यांचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. नाशिक जिल्हयातील कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातशुल्क मागे घ्यावे या मागणीसाठी १३ दिवस बाजार समित्यामधील लिलाव बंद ठेवले होते. यामुळे कांदा उत्पादकांना कांदा लिलावासाठी नेता आला नाही. परिणामी कांदा खराब झाला. त्यातूनही काही वाचलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल अशी आशा आता शेतकऱ्यांना आहे. तर चला पाहूयात लासलगाव आणि सोलापूर बाजार समितीत सध्या कांद्याला किती दर मिळतोय. 

लासलगावमधील कांदा आवक आणि दर
बाजार समिती - दिनांक - कांदा आवक (टन) - कमी कमी दर- जास्तीत जास्त दर - सरासरी
लासलगाव - 20/10/2023 - 6016 - 1200- 3422 - 3100
लगाव- 19/10/2023 - 9426- 1500- 3600 - 3200
लासलगाव- 18/10/2023 - 9250 - 1551 - 3611 - 3200
लासलगाव - 17/10/2023 - 9458 - 1200 - 3645 - 3301
लासलगाव - 16/10/2023 - 8530 - 1200 - 3201 - 3000

सोलापूर बाजार समितीत कांदा आवक आणि दर
बाजार समिती - दिनांक - कांदा आवक (टन) - कमी कमी दर- जास्तीत जास्त दर - सरासरी
सोलापूर - 19/10/2023 - 19991 - 100 - 4200 - 1800
सोलापूर - 18/10/2023- 19621 - 100 - 4500 - 1900
सोलापूर - 17/10/2023 - 11711 - 100 - 4500 - 2000
सोलापूर - 16/10/2023 - 10312 - 100 - 4500 - 1900

English Summary: fall in onion prices Income started to increase onion rate update nashik solapur
Published on: 20 October 2023, 01:09 IST