निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे फळ बागायतदारांचे मोठे नुकसान होत असते, त्या अनुषंगाने मायबाप शासनाने फळपिक विमा योजना अमलात आणली आहे. फळबाग पिक विमा योजनेत 2021-22 व्या वर्षी राज्यातील जवळपास 78 हजार शेतकरी पात्र झाली असून संबंधित फळ बागायतदारांना सुमारे 131 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिवसेंदिवस फळबागांना बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. कधी अवकाली कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे सर्वात जास्त नुकसान फळ बागायतदारांचे होत असते, त्यामुळे सरकारच्या या योजनेत फळ बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, आणि फळपिक विमा योजना काढावा असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने फळ बागायतदारांना केले आहे.
शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पीकपद्धतीत मोठा बदल घडवून आणला आहे, शेतकरी बांधवांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आता मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची लागवड केली आहे.
उत्पादन वाढीचे अनुषंगाने केलेला हा प्रयोग बहुतांशी यशस्वी देखील झाला मात्र असे असले तरी, अनेकदा फळ बागायतदारांना प्रतिकूल वातावरणाचा फटका बसत असतो. कधी दुष्काळसदृश्य परिस्थिती कधी अतिवृष्टी सारखी पूरग्रस्त परिस्थिती तर कधी गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होते. या निसर्गाच्या लहरीपणामुळे जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान होते. या नैसर्गिक संकटांमुळे सर्वात जास्त नुकसान फळबागांचे होत असते.
फळबागांसाठी बागायतदार लाखों रुपयांचा खर्च करत असतात, महागड्या औषधंची फवारणी करून, व योग्य व्यवस्थापन करीत फळबागायतदार फळबागा जोपासत असतात. मात्र एवढ्या लाखो रुपयांचा खर्च करून अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे फळ बागायतदारांना एक छदाम देखील प्राप्त होत नाही. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा फळ बागायतदारांना मोठा फायदा मिळू शकतो, म्हणून फळ बागायतदारांनी आपल्या जवळच्या कृषी विभागात भेट देऊन फळबागायतदारांनी शासनाच्या या योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Published on: 21 February 2022, 04:07 IST