आपण बघतो की कारखान्यामध्ये ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः २२ ते २५ मेट्रिक टनापर्यंत असते. ती वाहतूक करताना देखील देखील ड्रायव्हर लोकांना मोठी कसरत करावी लागते. असे असताना किसन वीर कारखान्याच्या ट्रॅक्टरने ४७.४५१ मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला.
या वाहन मालकाने केलेल्या कामाचे कौतुक करत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी ट्रॅक्टरने मालक अक्षय पवार व वाहन चालक संदिप दिलीप साबळे यांचा सत्कार केला. किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबळ झालेला होता.
मागील वर्षी गाळपा अभावी शेतात ऊस उभा होता. यामुळे ऊस उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे.
काय सांगता! या गाई एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध, आता दुधाचा दुष्काळच हटणार..
आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गाळप हंगाम मोठ्या उत्साहात सुरू केला. दोन्ही कारखाने सुरू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. सध्या ऊस वाहतूक जोरदार सुरु आहे. अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला.
मोठी बातमी! अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ
दरम्यान, सध्या राज्यात ऊस हंगाम मध्यावर आला आहे. गेल्यावेळी अनेकांचा ऊस शिल्लक राहिला होता. यामुळे मोठे नुकसान झाले होते. यंदा मात्र शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर घालवण्यासाठी धडपड करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता प्रत्येकाला मिळणार घर! पंतप्रधान आवास योजनेला वाढीव निधी
पीएम किसानच्या पुढील हप्त्यात शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये! योजनेची रक्कम वाढली आहे का? जाणून घ्या...
ब्रेकिंग! मराठा समाजाला मोठा धक्का, आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा अवैध..
Published on: 03 February 2023, 03:22 IST