फेसबुक इंक, शाओमी कार्पोरेशन, ॲमेझॉन आणि गुगल यासारख्या कंपन्या भारतातील डिजिटल लोन मार्केट मध्ये उतरण्याची योजना बनवित आहेत.आशा आहे की वर्ष 2024 पर्यंत भारतातील डिजिटल लोण इंडस्ट्री दहा खरब डॉलरपर्यंत मजल मारेल.
या सर्व कंपन्यांनी अगोदरच आपल्या योजनांची घोषणा केली आहे.तसेच छोटे भारतीय कर्जदाता सोबत भागीदारी करीत आहेत. भारतातील वाढत्या ऑनलाईन ट्रांजेक्शन या पार्श्वभूमीवर या टेक कंपन्या डिजिटल पेमेंट मार्केट लक्ष देत आहेत.
फेसबूक व्यवसायसाठी देणार 50 लाख पर्यंत कर्ज
एका अहवालानुसार, वर्ष दोन हजार ते वीस पर्यंत डिजिटल लेंडिंग 350 अरब डॉलर पर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. फेसबुक ने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की,कंपनी छोट्या व्यावसायिकांना कर्ज देणे सुरू करणार आहे.
त्यासाठी फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात देणाऱ्या कर्ज दातां सोबत भागीदारी केली जाईल. याबाबतीत फेसबुकने सांगितले की भारत हा पहिला देश आहे की फेसबुकने अशा प्रोग्राम सुरु केला आहे. सोबतच फेसबुकने सांगितले की स्मॉल बिझनेस लोन साठी पाच ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. या कर्जावर 17 ते20 टक्के वार्षिक व्याज असेल तसेच हे दिले जाणारे कर्ज हे विना गॅरंटी असेल.
बँक, स्टार्टअप डिजिटल लेंडर सोबत केली जात आहे भागीदारी
शाओमी इंडिया चे प्रमुख मनु जैन यांनी सांगितले की, शाओमी कंपनीकडून लोन, क्रेडिट कार्ड आणि इन्शुरन्स प्रॉडक्ट ऑफर करण्याची योजना बनवली जात आहे.यासाठी देशातील कोणतीही मोठी बँक आणि स्टार्ट अप डिजिटल लेंडर्स त्यांच्यासोबत भागीदारी केली जाईल.
अमेझॉन नेसुद्धा काही दिवसांपूर्वी फायनान्शिअल टेक्नॉलॉजी स्टार्टअप स्मॉल्केस टेक्नॉलॉजीस मध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कंपनीची वेल्थ मॅनेजमेंट सेक्टरमधील पहीली गुंतवणूक आहे. यासोबतच डिजिटल लोन मार्केट मधील फेअरिंग कॅपिटल, प्रेमजी इन्वेस्ट, सिकिया कॅपिटल इंडिया, ब्लूम वेंचर्स, बीनेक्स्ट, डीएसपी ग्रुप, अर्कमवेंचर्स, डब्ल्यूईएच वेंचर्स आणि एचडीएफसी बँक डिजिटल लोन मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत.
Published on: 01 September 2021, 03:57 IST