राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 3 ऑक्टोबर 2021 रोजी राज्याच्या विविध भागात गारपीट आणि अतिवृष्टी झाली होती. याचा फटका अनेक जिल्ह्यातील पिकांना बसला होता. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता.
अतिवृष्टीची मदत भंडारा जिल्ह्याला जाहीर करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबर 2021 रोजी राज्याच्या विविध भागात गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका भंडारा जिल्ह्यातील शेतीपिकांना बसला होता. भंडारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीचा निर्णय 24 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यात चक्रीवादळमुळे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार रु.99.00 लाख इतका निधी विभागीय आयुक्त, नागपूर यांचेमार्फत जिल्हाधिकारी, भंडारा यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी दिली आहे.
गारपीट आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने मदत दिली जाणार आहे. जे पात्र लाभार्थी असतील अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये ऑनलाईन पद्धतीने हा निधी वितरित करण्यात यावा. आणि हा निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांच्या यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात यावी, अशा सूचना या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत.
Published on: 27 January 2022, 12:53 IST