शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे निसर्गाचे दुष्टचक्र तर दुसरीकडे शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या चिंचोली लिंबाजी उपबाजार समिती या ठिकाणी व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे.
या उपबाजार समितीत कुठलीही पूर्वसूचना न देता व्यापारी चक्क मक्याचा लिलाव बंद पाडत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. यामुळे मक्याचे ट्रॅक्टर लीलावाअभावी बाजार समितीच्या आवारात उभे आहेत. सोमवारी देखील या बाजार समितीत व्यापाऱ्यांचा हा अनैतिक व्यवहार उजागर झाला होता यामुळे शेतकरी बांधवांचा रोष वाढतच आहे.
हेही वाचा:-Business Idea: 'या' पिकाची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर
चिंचोली लिंबाजी कृषी उत्पन्न उपबाजार समिती शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा या अनुषंगाने उभारण्यात आली होती. या उपबाजार समितीत नोव्हेंबर महिन्यापासून मका व भुसार शेतमालाची खरेदी होत आहे. मात्र आता या उपबाजार समिती मध्ये शेतकरी बांधवांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या अनैतिक व्यवहाराचा सामना करावा लागत आहे. बाजार समितीत रोजाना दुपारी 12 व सायंकाळी सहा वाजता शेतमालाची खरेदी केली जाते.
आता मात्र या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांची दबंगगिरी वाढली असून आता स्थानिक व्यापारी शेतकरी बांधवांचा माल अतिशय कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. बाहेरील व्यापारी स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा शेतीमालाला अधिक भाव देत आहेत मात्र यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मिरची झोंबली असून बाहेरील व्यापाऱ्यांना आता उपबाजार समितीत खरेदी करण्यासाठी येऊ दिले जात नाही. बाहेरील व्यापारी खरेदीसाठी बाजार समितीत दाखल झाले तर त्यांना व्यापाऱ्यांकडून धमकावले जात असून कमी दरात खरेदी करा असे फतवे जारी केले जात आहेत.
हेही वाचा:- दुःखद! उसाच्या फडात लागलेली आग विझवताना बळीराजाचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात हा पहिलाच प्रकार आहे असे नव्हे याआधी देखील मागील महिन्यात करंजखेड बाजार समितीत बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतमाल चढ्या किमतीने खरेदी केला असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केली होती. विशेष म्हणजे यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावच बंद पाडला होता यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र अद्यापही संबंधित व्यापाऱ्यांवर बाजार समितीकडून कारवाई करण्यात आलेली नाही.
हेही वाचा:-महाराष्ट्रात ऊसाचे विक्रमी गाळप पण; ऊस उत्पादक शेतकरी अजूनही एफआरपीच्या प्रतीक्षेत
नुकत्याच घडलेल्या या नव्या प्रकरणात कन्नड एपीएमसीच्या प्रशासक अर्चना वाडेकर यांनी सांगितले की, त्यांना याबाबत काही शेतकऱ्यांचे फोन आले होते, त्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी सचिव वानखेडे यांना बाजार समितीत पाठवले होते. परिसरातील शेतकऱ्यांचा मका हा परिसरातील इतर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना समज देऊ आणि समज देऊनही त्यांनी आपली दबंगगिरी सुरू ठेवली तर संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करू असे प्रशासक अर्चना यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:-भले शाब्बास मायबाप सरकार! जुन्नरच्या हापूसला जीआय टॅग; काय होणार याचे फायदे?
Published on: 08 April 2022, 09:47 IST