News

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरु आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Updated on 17 July, 2019 7:40 AM IST


मुंबई:
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरु आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

एक रक्कम परतफेड घटकामध्ये ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. 1.50 लाखाच्या वर आहे, अशा शेतकऱ्यांना रुपये 1.50 लाखावरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये 4.50 लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्यात येते. सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरुन त्यांना चालू खरीप हंगामामध्ये पिककर्ज घेणे सुकर होईल असे आवाहन सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे 50 लाख खातेदारांना रुपये 24 हजार 310 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे 44 लाख खातेदारांना रु. 18 हजार 500 कोटींचा लाभ देण्यात आला आहे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

English Summary: Extent Date till 31 October for lump sum repayment under debt waiver scheme for farmer
Published on: 16 July 2019, 02:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)