News

पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Updated on 01 September, 2023 3:52 PM IST

मुंबई 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपर्यत शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार आहे. याआधी सरकारने ३१ मार्च पर्यत पिकविम्या भरण्यासाठी अंतिम मुदत दिली होती.

पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत मुदतवाढ निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने सुरु केलेल्या १ रुपया पिकविमा योजनेतील सगळी माहिती ऑनलाईन माध्यमातून भरली जाते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसंच तांत्रिक अडचणी देखील होत्या त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसंच अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर काही जणांनी तर सीएससी सेंटरवरच थांबणं पसंत केलं होतं.

English Summary: extension of term for payment of crop insurance Big decision of the government know the new date
Published on: 31 July 2023, 01:01 IST