News

नाशिक: केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ आणि नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Updated on 25 June, 2020 8:17 AM IST


नाशिक: 
केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ आणि नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

यावर्षी पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले गेल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेले 2.50 लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे 23 जूनपासून मका खरेदी बंद करावी लागली होती. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका शिल्लक असल्याने मका खरेदीची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होती. त्यामुळे मका खरेदीस 15 जुलै, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याची तसेच खरेदी उद्दिष्टांमध्ये वाढ करून ती नऊ लाख क्विंटल करण्याची मागणी काल राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती.

तसेच भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला खरीप पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत 1.50 लाख क्विंटल ज्वारी (हायब्रीड) आणि 2.50 लाख क्विंटल मका खरेदी करण्यास मान्यता दिली होती. खरेदीची अंतिम मुदत 30 जून, 2020 पर्यंत होती. राज्याला दिलेले 2.50 लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे राज्यातील मका खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली होती.

मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका शिल्लक असल्याने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांचे किमान आधारभूत शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होती.त्यामुळे मका खरेदीच्या उद्दिष्टांत वाढ करून हे उद्दिष्ट नऊ लाख क्विंटल करून मका खरेदीची मुदत 15 जुलै पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली होती. केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

English Summary: Extension of procurement of maize from Central Government till 15th July
Published on: 25 June 2020, 08:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)