परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता (दि.१९) ऑगस्टपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. तसंच खरेदीच्या शेवटच्या आठवड्यात देखील दरात सुधारणा झाली आहे.
शनिवारी (ता. १२) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७ हजार ४३५ ते कमाल ७ हजार ८३५ रुपये, तर सरासरी ७ हजार ८२५ रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिली.
दरम्यान, बाजार समित्यांमधील भाव स्थिर होता. कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाच्या दरातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Published on: 14 August 2023, 07:00 IST