News

मुंबई: राज्यात मूग, उडीद व सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया हंगाम 2018-19 साठी सुरु आहे. या अंतर्गत 8 ऑक्टोबर अखेर प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुगासाठी 6 हजार 183, उडीद 8 हजार 851 व सोयाबीनसाठी 5 हजार 307 अशी एकूण 20 हजार 341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Updated on 09 October, 2018 9:03 PM IST


मुंबई:
राज्यात मूग, उडीद व सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया हंगाम 2018-19 साठी सुरु आहे. या अंतर्गत 8 ऑक्टोबर अखेर प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुगासाठी 6 हजार 183, उडीद 8 हजार 851 व सोयाबीनसाठी 5 हजार 307 अशी एकूण 20 हजार 341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

मूग व उडीदाच्या नोंदणीसाठी 15 दिवसांचा कालावधी वाढविला असून तो 24 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. तसेच मूग व उडीद खरेदी 11 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

English Summary: extended date 24 October for purchase Green and Black Gram by Minimum support price
Published on: 09 October 2018, 08:43 IST