News

मुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हंगाम 2018-19 मध्ये मूग आणि उडीद नोंदणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Updated on 25 October, 2018 7:08 AM IST


मुंबई:
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हंगाम 2018-19 मध्ये मूग आणि उडीद नोंदणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

याआधी मूगउडीद नोंदणीसाठी दि. 24 ऑक्टोबर 2018 आणि  सोयाबीन नोंदणीसाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत मुदत होती. यात बदल करुन मूगउडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी  शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत आता दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येणार आहे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

English Summary: extended date 15 November for purchase soybean, green and black gram by minimum support price
Published on: 25 October 2018, 07:05 IST