News

केंद्र सरकारने तुरीच्या आयातीला वर्षभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून त्यापाठोपाठ तेलबिया आणि खाद्यतेल मर्यादेमध्ये देखील मुदत वाढ केली असून आता केंद्राने खाद्य तेल आणि तेलबिया साठा मर्यादित याची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या हंगामातील सोयाबीनचा बाजारभावावर होऊ शकतो.

Updated on 02 April, 2022 8:12 AM IST

केंद्र सरकारने तुरीच्या आयातीला वर्षभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून त्यापाठोपाठ तेलबिया आणि खाद्यतेल मर्यादेमध्ये देखील मुदत वाढ केली असून आता केंद्राने खाद्य तेल आणि तेलबिया साठा मर्यादित याची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या हंगामातील सोयाबीनचा बाजारभावावर होऊ शकतो.

सोयाबीन दरावर होईल का परिणाम?

 आता पुढील खरीप हंगामातील सोयाबीन लागवड केल्यानंतर त्याची काढणी ऑक्‍टोबरच्या दरम्यान होईल. बहुतांश शेतकरी येणाऱ्या हंगामातील सोयाबीन ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातच बाजारपेठेतील म्हणजेच जेव्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येईल तेव्हा देखील ही साठा मर्यादा असेल. कारण याची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

नक्की वाचा:9 वर्षापासून बंद नासाकाचा बॉयलर पेटण्याचा मार्ग मोकळा-खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

त्यामुळे येणार्‍या हंगामात सोयाबीनचे बाजार भाव दबावात राहण्याची शक्यता आहे. जर आपण या हंगामाचा विचार केला तर या वर्षी सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झालेली होती तसेच सोया तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आहे त्यामुळे सोयाबीनचे दर टिकून आहेत. खरिपामध्ये सोयाबीन आणि भुईमूग हे मुख्य तेलबिया पिके असून येणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीन ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात विक्रीसाठी यायला लागेल तोपर्यंत खाद्य तेलाचे दर कमी झाले तर सरकार साठे ची मर्यादा देखील काढू शकते.

सोयाबीनची लागवड खरिपामध्ये किती प्रमाणात होईल त्यानंतर उत्पादन हाती किती प्रमाणात येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजार नेमका कसा राहील यावर स्टॉक लिमिट चा परिणाम ठरेल.  यावर्षी आपण पाहिले किशेतकऱ्यांनी सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकली. त्यामुळे बाजार भाव टिकून राहिला. त्यामुळे येणार्‍या हंगामात सुद्धा शेतकऱ्यांची भूमिकाच सोयाबीनचे बाजार भाव ठरवण्यासाठी महत्वाची राहण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा:म्हणे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार; उलट चार राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट- संसदीय समितीची माहिती

मोहरीवर काय होईल परिणाम?

 जसे सोयाबीन ऑक्टोबरपर्यंत बाजारात विक्रीसाठी येते त्याचप्रमाणे मोहरीची विक्री मार्च आणि एप्रिल महिन्यात करतात.

परंतु आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर सध्या खाद्य तेलाचे दर खूपच प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या स्टोक लिमिट च्या निर्णयाचा परिणाम सध्यातरी मोहरीच्या दारावर जास्त जाणवणार नाही असे जाणकारांचे मत आहे. सध्या मागणीच्या मानाने पुरवठा फारच कमी असल्याने सध्या तरी या निर्णयाचा परिणाम हातातील या पिकांवर होणार नाही असे वाटते.

English Summary: extend limit of storage capacity of edible oil and oil seed so effect on soyabioen crop
Published on: 02 April 2022, 08:12 IST