जेव्हा 2020 मध्ये कोरोना आला तेव्हा सगळीकडे भयानक परिस्थिती उद्भवली होती. यामध्ये लॉकडाऊन लागल्याने गरीब लोकांचे म्हणजेच मजुरांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले होते.
अनेकांचे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली होती. याच पार्श्वभूमीवर मार्च दोन हजार वीस मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली व या योजनेच्या माध्यमातून गरीब लोकांना पाच किलो धान्य मोफत देण्याचे सुरू केले. केंद्र सरकारच्या पीएम गरीब योजनेला केंद्र सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असून या योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत धान्य देण्यात येते.
या योजनेची मुदत येत्या 31 मार्चला संपणार होती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी मुदत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे देशातीलकोट्यवधी गरीब लोकांना दिलासा मिळणार आहे.
या मुदतवाढ मिळाल्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत लोकांना पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीपीएम गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देऊन गरिबांच्या घरची चूल पेटती ठेवली आहे. त्यामुळे गरीब उपाशी झोपणार नाहीत. 2020 मध्ये कोरोना काळात गरिबांना आधार मिळावा यासाठी मोदी यांनी ही योजना सुरू केली होती मात्र कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सुद्धा ही योजना चालू ठेवत गरिबान बद्दल संवेदनशीलतादाखवले आहे असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
हे मुदतवाढ मिळाल्यामुळे या योजनेवर तीन लाख चार कोटी रुपये खर्च येणार असून या माध्यमातून गरीब कुटुंबांना एक हजार तीन लाख टन धान्य मिळणार आहे. आतापर्यंत केंद्रीय अन्नपुरवठा खात्यामार्फत या योजनेच्या माध्यमातून 759 लाख टन धान्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आले आहे.
Published on: 27 March 2022, 09:43 IST