News

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळ समझोता साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या संदर्भातील शासन निर्णय दि. 29 सप्टेंबरला निर्गमित करण्यात आला.

Updated on 30 September, 2018 10:03 PM IST


मुंबई:
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळ समझोता साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या संदर्भातील शासन निर्णय दि. 29 सप्टेंबरला निर्गमित करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017’ या योजनेअंतर्गत मुद्दल व व्याजासह रु. 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (One Time Settlement) योजनेखाली पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2018 ते दि. 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

सदर शासन निर्णय पाहण्यासाठी लिंक: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017

राज्यामध्ये सन 2009-10 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दि. 24 जून 2017 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय दि. 28 जून 2017 अन्वये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017’ घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ समझोता योजनेत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत बँकेत जमा करण्यास मुदत देण्यात आली आहे. सदरची मुदत दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी संपुष्टात येत असल्याने त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

English Summary: Extend date up to 31st December for a one-time settlement under chatrapati shivaji maharaj shetkari sanman yojana
Published on: 29 September 2018, 09:39 IST