काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने यापूर्वी जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा पुरोगामी निर्णय घेतला होता. आता सातबारा उतार्यावरील जातीचे नाव हद्दपार करण्याच्या निर्णयाने गावागावांत सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होणार आहे. यामुळे आता यामध्ये बदल होणार आहे.
आता राहाता तालुक्यातील बाभळेश्वर व नेवासा तालुक्यातील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावांतील ग्रामपंचायतीने सातबारा उतार्यावरील शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा ठराव घेतला. यामुळे आता यामध्ये बदल दिसणार आहे.
दरम्यान, या ठरावास जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या आठ गावांतील सातबारा उतार्यांवरील जातीची नावे आता हद्दपार होणार आहेत. असेच सगळीकडे झाले तर जातीभेद देखील कमी होणार आहेत.
काळजी घ्या! अमेरिकेत मंकीपॉक्सचा कहर, आरोग्य आणीबाणी जाहीर
महसूल विभागाने 25 ऑगस्ट 2021 रोजी सातबारा उतार्यातील शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात नोंदविण्यात आलेल्या जातीवाचक नावाची नोंद कमी केली. तसेच सुधारित नोंद घेण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता.
...तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, राजू शेट्टींनी सांगितला बाजारभाव मिळण्याचा सोप्पा मार्ग
यामध्ये गावातील स्थानिक-भौगोलिक स्थितीशी निगडित, नदी नाल्याची निगडित नावे देण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. आता सातबारा उतार्यावरील जातीचे नाव हद्दपार करण्याच्या निर्णयाने गावागावांत सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
अधिक उत्पादनातून भरघोस नफा मिळवून देणारी कारल्याची लागवड, शेतकऱ्यांसाठी ठरत आहे फायदेशीर..
अखेर उद्या डिसले गुरुजी अमेरिकेत जाणार! अनेक घडामोडींमधून निघाला मार्ग..
वीज बिल येईल आपोआप कमी, घरातील 'ही' उपकरणे करा बंद
Published on: 07 August 2022, 04:36 IST