शेतकरी आणि बैल याचे नाते कसे असते, हे वेगळे सांगायची गरज नाही. आज श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा (Bail Pola) म्हणून साजरा केला जातो. यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी मोठा उत्साह बघायला मिळतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यामुळे राज्यातील शेतकरी हा सण उत्साहात साजरा केला जातो.
आजचा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. आज बैलांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात.
त्याला खायला गोड पुरणपोळी किंवा सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. अशाप्रकारे बैलांना सजवतात. यादिवशी राज्यात खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. जुन्या काळातील अनेक गोष्टी सजवल्या जातात.
ठाकरेंनी डावलले आता शिंदे देणार बळ! सेनेच्या वाघाची होणार सभागृहात एन्ट्री
नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. तसेच बैल मारुतीच्या देवळात घेऊन जातात. नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.
आमदारांच्यात धक्काबुक्की सुरु होताच नितेश राणेंनी काढला पळ? व्हिडिओ व्हायरल..
राज्यात अनेक ठिकाणी हा सण आज साजरा करतात. तर पूढच्या महिन्यात देखील अनेक ठिकाणी पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या;
धक्कादायक! पतीला परदेशी महिलेसोबत पाहून पत्नीला आला राग, आधी खून आणि नंतर बिर्याणी बनवून..
आर्थिक नियोजन करावं ते दादांनीच! कोरोनात अजित पवारांचे अचूक नियोजन, कॅगकडून कौतुक
ब्रेकिंग! आता दिल्लीत सत्तांतर? केजरीवालांच्या बैठकीला आमदार गायब, मोठी राजकीय घडामोडीची शक्यता..
Published on: 26 August 2022, 10:33 IST