1. बातम्या

भारतातून बासमती तांदळाची तीस हजार कोटींची निर्यात

KJ Maharashtra
KJ Maharashtra
basmati rice

basmati rice

 भारत हा जगातील प्रमुख तांदूळ उत्पादक देश आहे. भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परदेशात मागील काही वर्षांपासून वाढलेली भारतीय तांदुळाची  मागणी ही वाढतच आहे. सन 2020-21 च्या आर्थिक वर्षात भारतातून चप्पल तीस हजार कोटी रुपयांचा तांदूळ परदेशात निर्यात करण्यात आला.

 याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झाला.  जवळ जवळ  46.30 लाख मेट्रिक टन तांदळाची निर्यात भारताने विदेशात केली. भारताने आखाती देश, चीन आणि पाकिस्तानचा जवळजवळ जगभरातील 125 देशांमध्ये बासमती तांदळाची निर्यात केली.

 उत्तर प्रदेश राज्य मध्ये तांदळाची भरपूर प्रमाणात लागवड करण्यात येते व त्यामध्ये बासमती तांदळाची शेती जास्त प्रमाणात केली जात असल्याने तिकडची शेतकरी त्यांच्याकडील धान किंवा तांदूळ निर्यातदारांना  विकतात व निर्यातदार तो खरेदी केलेला बासमती तांदूळ सरळ  प्रदेशात विक्री करतात. त्यामुळे या वाढलेल्या निर्यातीचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल तीस हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ  निर्यात करण्यात आल्याची माहिती मेरठ येथील बासमती निर्यात विकास प्रतिष्ठानचे मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश शर्मा यांनी दिली.

 भारत सरकारने पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांना बासमती तांदळाची लागवड करण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या बासमती तांदळाचा चांगला दर मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे.

या निर्यात केल्या जाणाऱ्या बासमती तांदळ हा बासमती निर्यात विकास प्रतिष्ठान यांच्याकडून प्रमाणे झाल्यानंतरच त्याची परदेशात निर्यात केली जाते. तसेच परदेशात जाणाऱ्या बासमती तांदळाच्या गुणवत्तेवर खास लक्ष ठेवण्यात येते. निर्यात केला जाणारा बासमती तांदूळ हा फक्त भारत सरकारने अधिसूचित केलेल्या राज्यांमधूनच केला जातो.

 बासमती तांदळाचा वर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बासमती तांदळाचे पीक किडी पासून वाचवण्यासाठी कायम जागरूक राहणे आवश्यक आहे. उत्तर भारताचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून बासमती तांदळाच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. बासमती निर्यात विकास प्रतिष्ठान त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन सातत्याने करत असते.

 

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters