News

खानदेशात कांदा उत्पादक नवीन एका अडचणीत सापडले आहेत. हे अडचण आहे कांदा बियाणांची, दर वाढल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना बियाणे घेणे परवडत नाही. तर काही ठिकाणी बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Updated on 28 October, 2020 10:18 AM IST


खानदेशात कांदा उत्पादक नवीन एका अडचणीत सापडले आहेत. हे अडचण आहे कांदा बियाणांची, दर वाढल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना बियाणे घेणे परवडत नाही. तर काही ठिकाणी बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  खानदेशात उन्हाळा किंवा रब्बी हंगामातील कांदा लागवडीवर महागडे बियाणे व इतर कारणांमुळे परिणाम होईल. अशी स्थिती आहे. लागवड धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात कमी होऊ शकते. मागील हंगामात जळगाळ जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सुमारे १४ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. धुळ्यातही सुमारे १० हजार हेक्टर उन्हाळ कांदा होता. तर नंदुरबारातही सुमारे अडीच हजार हेक्टर कांदा होता.

कारण गेल्या काही वर्षी  पाऊस चांगला होता. कारण गेल्या वर्षी पाऊस चांगला होता. पण मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनामुळे बाजार समित्यांचे कामकाज बंदावस्थेत गेले. यामुळे दर कमी मिळाले. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन  खर्चही निघाला नाही. यंदाही चांगला पाऊस आहे. पाणी अवर्षणप्रवण भागातही मुबलक आहे.  उन्हाळा कांद्यासाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा, धरणगाव, जामनेर आदी भाग प्रसिद्ध आहे. धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा भागात कांद्याची लागवड बऱ्यापैकी होते. तर नंदुरबारमध्ये आणि नवापूर तालुक्यात कांदा लागवड बऱ्यापैकी  होत असते, यंदा ही लागवड वाढेल असे सुरुवातीला वाटत होते. पण बियाण्याचे दर वाढले आहेत. प्रतिकिलो ३ हजार ते ४२०० रुपये दर कांदा बियाण्यासाठी घेतले जात आहेत.

एकरी एक किलो बियाणे हवे असते. खरिपातील कांदा बियाण्याबाबत कमी उगवण शक्तीच्या अनेक तक्रारी आल्या. यामुळे हे बियाणे किती उगेल, याची शाश्वती नाही. गेल्या वर्षी  कांदा बियाणे  एक हजार ते १२०० रुपये प्रतिकिलो, या दरात मिळत होते. यंदा बियाण्याची मोठी टंचाई आहे, अधिक मागणी असलेले बियाणे बाजारात उपलब्ध नाही. काळा बाजारही सुरू आहे. यामुळे शेतकरी संभ्रमातही आहेत.परिणामी कांदा लागवड कमी होईल,अशी स्थिती आहे. कांद्याचे दर सध्या चांगले आहेत. परंतु पुढे दर टिकून राहतील,का हा मुद्दा आहे. कांदा लागवड खानदेशात यंदा २० ते २५ टक्के कमी होऊ शकते.

English Summary: Expensive seeds are likely to reduce onion cultivation in Khandesh
Published on: 28 October 2020, 10:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)