News

मित्रांनो आंबे खाणे कुणाला आवडत नाही? या जगात क्वचितच लोक असतील ज्यांना आंबे खाणे आवडत नसेल. जवळपास प्रत्येक व्यक्तीला आंबे खाणे आवडते. लोक अनेक प्रकारचे व जातींचे आंबे खात असतात. महाग किंवा स्वस्त दोन्ही प्रकारचे आंबे आपण सर्वजण खात असतो. मित्रांनो मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल सांगणार आहोत.

Updated on 19 May, 2022 4:40 PM IST

मित्रांनो आंबे खाणे कुणाला आवडत नाही? या जगात क्वचितच लोक असतील ज्यांना आंबे खाणे आवडत नसेल. जवळपास प्रत्येक व्यक्तीला आंबे खाणे आवडते. लोक अनेक प्रकारचे व जातींचे आंबे खात असतात. महाग किंवा स्वस्त दोन्ही प्रकारचे आंबे आपण सर्वजण खात असतो. मित्रांनो मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल सांगणार आहोत.

जगातील सर्वात महाग आंबा तैयो नाही तामागो आहे. हा आंबा त्याच्या किमतीसाठी संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. भारतात देखील या जातीचा आंबा आढळतो, विशेष म्हणजे या आंब्याच्या संरक्षणाखाली जंगली कुत्रे आणि काही सुरक्षा रक्षक देखील तैनात केले गेले आहेत. निश्चितच तुम्हाला आता या आंब्याच्या किमतीविषयी जाणून घ्यायचे असेल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया जगातील सर्वात महागडा आंबा नेमका आहे तरी किती रुपयाला.

तैयो नाही तामागो आंब्याविषयीं अल्पशी माहिती 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आंब्याची ही जात जपानमधील मियाझाकी प्रांतात आढळते. असे असले तरी भारतात देखील या जातीच्या आंब्याची झाडे आहेत. या आंब्याची किंमत ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो. मित्रांनो या जातीच्या दोन आंब्यांची जोडी अडीच लाख रुपयांपर्यंत विकली जाते. विशेष ऑर्डर मिळाल्यावरच त्यांची लागवड केली जाते, म्हणजेच हा आंबा सहज विकत घेता येणे अशक्य आहे.

IMD Monsoon News : पुढील चार दिवस महत्वाचे; 'या' भागात होणार जोरदार पावसाचे आगमन

कसा दिसतो जगातला सर्वात महागडा आंबा

या जातीचा आंबा हा प्रामुख्याने अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. असे असले तरी कधी कधी हा जांभळा देखील दिसतो. दिसायला हा आंबा अतिशय सुंदर असतो. जपानमध्ये या जातीचा आंबा उन्हाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात काढणीसाठी तयार होतं असतो. या जातीच्या आंब्याची किंमत खूप जास्त असते कारण की हा आंबा विशिष्ट पद्धतीने तयार केला जातं असल्याचा दावा केला जातो.

या आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळत असल्याचे तज्ञांचे मत आहे. या आंब्याचे सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होतं असते. एवढेच नाही तर यामध्ये असलेले औषधी गुणधर्म सामान्य कर्करोगास प्रतिबंधित करत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या आंब्याचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करत असते.

शिवाय त्वचेसाठी फायदेशीर असते आणि उष्माघातास प्रतिबंधित करण्याची क्षमता देखील त्यामध्ये असते. तज्ञ लोक सांगतात की, याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील कमालीची वाढते.

युरिया खत खरेदीसाठी नवा नियम लागू; तीन गोण्यांसोबत घ्याव्या लागणार "या" दोन बाटल्या

हा महागडा आंबा सामान्य भूरसट लाल रंगाचा असतो आणि त्याचा आकार डायनासोरच्या अंड्यासारखा असतो. असे म्हटले जाते की, जपानमध्ये हा आंबा विशेष हवामानात पिकतो आणि अनेक प्रकारच्या चाचण्या केल्यानंतरच या महागड्या आंब्याची निर्यात केली जाते.

कसा पिकवला जातो हा आंबा अन काय आहे किंमत 

या आंब्याच्या झाडावर फळ येताच प्रत्येक फळाला जाळीच्या कापडाने बांधले जाते. या आंब्याचे वजन 350 ग्रॅम पर्यंत असते. हाती आलेल्या माहितीनुसार, या जातीच्या 700 ग्रॅम दोन आंब्यांची किंमत 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते. म्हणजेच या जातींचे एक किलो आंबे खरेदी करण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

New Helpline: आता १०० नाही तर या नंबरवर मिळणार पोलीसांची मदत, लवकरच निर्णय

2017 मध्ये लागली होती या आंब्याला विक्रमी बोली 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, 2017 मध्ये या आंब्याच्या जोडीचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात हा आंबा विक्रमी 3600 डॉलर रुपयाला विकला गेला होता म्हणजेच त्यावेळी हा आंबा सुमारे दोन लाख 72 हजार भारतीय रुपयांना विकला गेला होता.

हा दुर्मिळ आंबा भारतातही आढळतो

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, हा आंबा प्रामुख्याने जपानमध्ये उत्पादित केला जातो. जपानच्या मियाझाकी नामक शहरात या आंब्याची शेती नजरेस पडत असते. असे असले तरी भारत आणि दक्षिण आशियामध्ये देखील हा आंबा खुप लोकप्रिय आहे. आपल्या देशात देखील या आंब्याची झाडे बघायला मिळतात. आपल्या देशातील बिहार राज्यात या आंब्याचे झाड बघायला मिळते. बिहारमधील पूर्णियामध्ये एक झाड आहे आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये याची काही झाडे बघायला मिळतात.

Sarkari Yojana Information: 'या' सरकारी योजनेचा लाभ घ्या; 1 रुपयात मिळणार 2 लाखांचा विमा; वाचा सविस्तर

पूर्णिया येथे या जातीचे एकमेव झाड भट्टा दुर्गाबारी येथील माजी आमदार अजित सरकार यांच्या घरी 25 वर्षांपासून आहे. त्यांना या दुर्मिळ प्रजातीच्या आंब्याचे रोप भेट म्हणून देण्यात आले आहे. या आंब्याची लागवड करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, जेव्हा त्याने हे रोप लावले तेव्हा त्याला त्याच्या किमतीची कोणतीच कल्पना नव्हती. त्याने या आंब्याचे झाड बागेत शोभा म्हणुन लावले होते. मात्र आंब्याचे महत्त्व आणि लिलावाची बाब समोर येताच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, लोकांना या आंब्यावर पहारा ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

English Summary: Expensive Mango: 'Ha' is the most expensive mango in the world; You too will break a sweat when you hear the price
Published on: 19 May 2022, 04:40 IST