News

मागील काही वर्षांपासून सिंदखेडराजा तालुक्यामध्ये दुष्काळाचे सावट होते, तरी सुध्दा स्वतः च्या इच्छा शक्तीच्या जोरावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड केली आहे.शेतकरी फळबागाकडे वळत असल्याचे पहायला मिळत आहे.शेतकऱ्यांनी शेतात नियोजन बद्ध पद्धतीने पिके घेतली तर आर्थिक दृष्टया फायदा होतोच त्यांचेच उदाहरण म्हणजे तालुक्यातील शेलगांव राऊत या गांवातील शेतकरी बबन शेषराव राऊत यांनी दीड एकर मध्ये द्राक्षाची लागवड केली आहे.

Updated on 23 April, 2021 6:08 PM IST

मागील काही वर्षांपासून सिंदखेडराजा तालुक्यामध्ये दुष्काळाचे सावट होते, तरी सुध्दा स्वतः च्या इच्छा शक्तीच्या जोरावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड केली आहे.शेतकरी फळबागाकडे वळत असल्याचे पहायला मिळत आहे.शेतकऱ्यांनी शेतात नियोजन बद्ध पद्धतीने पिके घेतली तर आर्थिक दृष्टया फायदा होतोच त्यांचेच उदाहरण म्हणजे तालुक्यातील शेलगांव राऊत या गांवातील शेतकरी बबन शेषराव राऊत यांनी दीड एकर मध्ये द्राक्षाची लागवड केली आहे.त्यातून त्यांना ३ लाखांचे उत्पादन होऊन दीड ते दोन लाख रुपये नफा राहण्याची आशा आहे.

बबन राऊत यांनी आपल्याकडे असलेल्या दीड एकर मध्ये ऑक्टोबर २०१६ मध्ये नाशिक वरून साधी सोनाटा जातीचे १४०० द्राक्षाची रोपे १५ रुपये किंमतीने आणली त्यानंतर त्यांनी ९ बाय ४ वर द्राक्षाची लागवड केली. कृषी विभागाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे योजने मध्ये प्रस्ताव सादर केला. कृषी विभागांकडून ३० बाय ३० चे शेततळे मंजुर झाले, परंतु आपला द्राक्षाच्या बागेला पाणी पुरेसे मिळणार नाही म्हणून स्वखर्चातून शेततळ्याची १२५ बाय १२५ लांबी रुंदी व २५ फूट खोली करून द्राक्ष बगीचाला पुरणारे पाणी कृषी विभागांच्या योजनेतून व स्वखर्चातुन उपलब्ध केले.

द्राक्षाच्या रोपाची लागवड केल्यानंतर त्याला १० ट्रॉली शेणखत टाकले दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी करण्यात येते.त्यामुळे द्राक्षाच्या झाडाला जवळपास १५ ते २० किलो द्राक्ष आहे. २०१८ साली पहिलाच वर्षी जवळपास ७० क्विंटल द्राक्ष झाली ,त्यानंतर २०१९ मध्ये १०० क्विंटल द्राक्ष झाले तर यावर्षी साधारणपणे १२५ क्विंटल पेक्षा जास्त द्राक्ष मिळण्याची अपेक्षा आहे.यावर्षी द्राक्ष शेतीतून ३ लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यांमधून औषधी , द्राक्ष छाटणी व इतर खर्च वजा जाता १.५ ते २ लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे.

 

शेततळ्याचे यशस्वी जलसंधारण :- द्राक्ष क्षेत्र अधिक असल्याने पाण्याची शास्वती होण्याची गरज होती त्यादृष्टीने मागेल त्याला शेततळे यामधून शेततळे मंजूर करून त्यामध्ये स्वतः अधिकचा खर्च करून ३० गुंठे मध्ये शेततळे उभारले विहीर च्या माध्यमातून या शेततळ्यामध्ये पाणी साठविले जाते दरवर्षी पावसाळ्यात पाण्याची संचलन केले जाते. या शेततळ्यामध्ये साधारण २१ लाख ९६ हजार लीटर पाणी साठवण क्षमता तयार झाली आहे.


शेततळ्यातून मत्स्यव्यवसायाची सुरुवात :-

द्राक्ष बागेमुळे शेतकरी बबन राऊत यांना आत्मविश्वास निर्माण झाला त्यामुळे त्यांनी शेततळ्यामध्ये विविध जातीचे मत्स्यबीज खरेदी केले त्यांना शेततळ्यामध्ये सोडले. त्यांना दररोज खाद्य टाकले जाते.जवळपास शेततळ्यामध्ये १ हजार मत्स्यबीज टाकण्यात आले आहे,माशांची योग्य वाढ व सुरक्षितता करण्यासाठी कंपाऊंड,जाळी, खांब बसविण्यात आले आहे.एका माशांचे वजन एक किलो पेक्षा जास्त आहे असे शेतकरी बबन राऊत यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया
फळबाग शेती फायदेशीर आहे पण फळबाग लागवड केल्यानंतर मेहनत , वेळोवेळी फवारणी,यासह अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते.सद्या संचारबंदी व लॉक डाऊन चा परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे शेतीमाला योग्य भाव मिळत नाही.त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या फळांना व पिकांना योग्य भाव देण्यात यावा हीच अपेक्षा.

बबन राऊत
द्राक्ष फळबाग शेतकरी शेलगांव राऊत ता.सिंदखेड राजा


प्रतिनिधी- गोपाल उगले
मो -9503537577

English Summary: Expect 3 lakh production from grapes in Sindkhed Raja taluka; Farmers tend to orchards 23
Published on: 23 April 2021, 06:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)