यावर्षी जागतिक बाजारपेठेतील कमोडिटी च्या वाढत्या मागणीमुळे वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात देशाची गव्हाची निर्यात 100 लाख टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यतावाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले आहे.
2020-21 मध्ये 21.55 लाख टनांच्या तुलनेत 2021-22 चा विचार केला तर गव्हाची निर्यात 70 लाख टन म्हणजेच 15 हजार कोटी रुपये पर्यंत ओलांडली आहे. तर या सगळ्या वर्षांची तुलना केली तर 2019 -20 मध्ये ती केवळ दोन लाख टन निर्यात झाली होती. पियुष गोयल म्हणाले की गव्हाचे निर्यातीमुळे अनेक देशांना अन्नसुरक्षेचा गरजा पूर्ण करण्यात मदत झाली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात करणे सुरू ठेवू आणि ज्या देशांना संघर्ष क्षेत्रातून त्यांचा पुरवठा होत नाही त्यांच्या गरजा या माध्यमातून पूर्ण करू.
नक्की वाचा:मोठी बातमी! मागेल त्याला शेततळे योजना बंद; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
यावर्षी भारत कदाचित शंभर लाखापेक्षा जास्त गहू निर्यात सहज करू शकू असे माझे स्वतःचे मत आहे असे गोयल यांनी सांगितले.
सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचा जागतिक गव्हाचा पुरवठा पैकी जवळपास एक चतुर्थांश वाटा आहे. यावर्षी या दोन्ही देशांचा विचार केला तर तेथील गव्हाचे पीक ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये काढणीस येईल. आपल्याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष हे उत्पादन वाढवण्यावर असून गुजरात आणि मध्य प्रदेश या सारख्या राज्यातून गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.
जागतिक निर्यातीत भारताचा वाटा
जागतिक गव्हाच्या निर्यातीचा विचार केला तर भारताचा वाटा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. 2016 मध्ये हा वाटा 0.14 टक्क्यांवरून 2020 मध्ये 0.54 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भारत हा जगातील दुसरा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. 2020 मध्ये भारताचा जगाच्या 51 उत्पादनात वाटा हा 14 टक्क्यांच्या पुढे होता. भारतात दरवर्षी सुमारे एकशे सात दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होते व त्याचा सगळ्यात मोठा हिस्सा हा देशात वापरला जातो.
Published on: 05 April 2022, 10:31 IST