News

या मॉन्सूनच्या हंगामात स्थानिक पातळीवर बियाणे विकसित करण्यात आली होती. परंतु हे बियाणे अतिपाऊस आणि कीटकांच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याने भारतातीस सोयाबीन शेतकरी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.

Updated on 10 October, 2020 3:30 PM IST


या मॉन्सूनच्या हंगामात स्थानिक पातळीवर बियाणे विकसित करण्यात आली होती. परंतु हे बियाणे अतिपाऊस आणि कीटकांच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याने भारतातीस सोयाबीन शेतकरी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. भारतात सोयाबीनच्या उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांचे वर्चस्व आहे, जे एकूण उत्पादनात ८९ टक्के योगदान देते.  उर्वरित ११ टक्के उत्पादनात राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातचा वाटा आहे. दरम्यान पिकांचे नुकसान झाल्याने मध्य प्रदेशमधील शेकडो शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात निषेध केला. शेतकरी कोरोनाच्या काळात  खूप कठीण परिस्थितीतून जात आहेत. ‘’आम्ही जे काही पैसे गुंतवले होते, ते आम्ही गमावले. आता शेती  करणे आमच्यासाठी अशक्य आहे’’,  असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

महाराष्टात  दीड लाखाहून अधिक तक्रारी, सोयाबीन बियाणे उगवण्याच्या विफलतेविरूद्ध  आणि ८३ एफआयआर देण्यात आले होते. पेरणी व्यवस्थित करूनही राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांनी त्यांच्या शेतात उगवण अपयशीपणाचा झाली ते निकृष्ट बियाणांमुळे हा  अहवाल दिला आहे. बियाण्यांच्या निकृष्ट दर्जापासून, जमिनीत अपुरा ओलावा ते खोल पेरण्यापर्यंत अनेक कारणांमुळे तीलबिया वेळेवर अंकुरण्यास अपयशी ठरले. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया (एसओपीए) च्या अंदाजानुसार सुमारे २० ते २५ टक्के बियाणे पेरणीसाठी आवश्यक आहे.

सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया (एसओपीए) ने  मध्य प्रदेशात (एमपी) जोरदार पाऊस पडल्यामुळे १० ते १२ टक्के पीक नुकसान होण्याची शक्यता आहे असे नमूद केले. राज्यातील पर्जन्यवृष्टीच्या भागातील उद्योग मंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार सोपाने सांगितले राज्यातील निम्या पेक्षा जास्त जिल्हे यामुळे  बाधित झाले आहेत. यामुळे शेतकरी सरकारकडे मदतीची हाक देत आहेत.

English Summary: Excessive rains and pests destroy crops, soybean farmers call for help
Published on: 10 October 2020, 03:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)