News

भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचे काल निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतात शेती क्षेत्रात झालेल्या संशोधनात एम एस स्वामिनाथन यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

Updated on 29 September, 2023 1:33 PM IST

भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचे काल निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतात शेती क्षेत्रात झालेल्या संशोधनात एम एस स्वामिनाथन यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

त्यांच्या जनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशात जी ६० च्या दशकात हरित क्रांतीने देशात मोठा बदल घडवला. या हरित क्रांतीचे एम एस स्वामिनाथन हे जनक होत. या हरित क्रांतीमुळे देशातील अन्नधाधान्य टंचाई दूर झाली.

त्यांच्या कार्यात शेती आणि शेतकरी कायम केंद्रस्थानी राहिला. जेव्हा केव्हा शेतकरी आंदोलने होतात. तेव्हा स्वामिनाथन आयेगोच्या अहवालावर भर दिला जातो. तो स्वामिनाथन आयोगाचा अहवाल नेमका काय आहे? ते जाणून आता घेऊयात

२००४ ला जेव्हा यूपीएचं सरकार सत्तेत होते. तेव्हा एक आयोग बनवण्यात आला. नॅशनल कमिशन ऑफ फार्मर्स (NCF) आयोग नेमण्यात आला. तेव्हा या आयोगाचे अध्यक्ष होते डॉ. एम. एस. स्वामिनाथन.

NCF ने २००४ ते २००६ या दोन वर्षात एकूण पाच अहवाल सादर केले. या अहवालांना स्वामिनाथन अहवाल नावाने ओळखले जाते. या अहवालात शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकाधिक सुधारावी यासाठी काय करता येईल, यावर अहवाल सादर केला गेला.

या अहवालात वारंवार शेतीत सुधारणाही यात सुचवण्यात आल्या आहेत. देशात खाद्यान्न आणि पोषण सुरक्षेसाठी रणनिती आखली जावी. शेती प्रणालीची उत्पादकता आणि स्थिरतेमध्ये सुधारणा केली जावी. शेतकऱ्यांना ग्रामीण कर्ज अधिक प्रमाणात देण्याची योजना आखली जावी.

जिरायती भागात शेती करणाऱ्य़ा किंवा डोंगर उतारावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असाव्यात. शेतीशी संबंधित वस्तूंची क्लालिटी आणि किंमत याकडेही सरकारचे विशेष लक्ष असावं. जेव्हा जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या किमती घसरतात तेव्हा आयात करण्याचं सरकारने टाळावे.

किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP होय. म्हणजे कोणत्याही शेतमालाचा बाजारभाव काय असावा, याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जातो. ती किंमत म्हणजे MSP होय. या बाजारभावाच्या खाली तुम्ही या धान्य किंवा इतर शेतमाल विकत घेऊ शकत नाही.

शेतकऱ्यांच्या खिशात किमान काही ठराविक रक्कम पडावी. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याची शिफारसही स्वामिनाथन आयोगानेच केली होती.

देशातील सगळ्यात महाग म्हस, म्हणतात म्हशींची राणी, किंमत एवढी की येतील 2 फॉर्च्युनर कार...

English Summary: exactly is the Swaminathan Commission report? Will farmers get strength? detail..
Published on: 29 September 2023, 01:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)