News

आमदार जाधव हे दिल्लीत काही कामानिमित्त आले होते. दिल्लीत आल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दरम्यानच त्यांना गडकरींच्या निवासस्थानी असतानाच त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला.

Updated on 24 July, 2023 4:07 PM IST

नवी दिल्ली

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नवी दिल्ली येथे ह्दयविकाराचा झटका आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेले जाधव यांना गडकरींच्या निवासस्थानीच झटका आल्याची माहिती आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आमदार जाधव हे दिल्लीत काही कामानिमित्त आले होते. दिल्लीत आल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दरम्यानच त्यांना गडकरींच्या निवासस्थानी असतानाच त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, डॉक्टरांनी जाधव यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले आहेत. वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने जीवावरचं संकट टळलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच हा सौम्य धक्का होता, असंही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

English Summary: Ex-MLA Harshvardhan Jadhav suffers heart attack Prakriti stable
Published on: 24 July 2023, 04:07 IST