News

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक नवी कल्पना देत आहोत. हा व्यवसाय तुम्ही माफक गुंतवणूक करून सुरू करू शकता. गवती चहाच्या शेतीचा (Lemon Grass Farming) व्यवसाय तुम्ही करू शकता. गवती चहाला 'लेमन ग्रास' (Lemon Grass) असंही म्हटलं जातं. या शेतीतून (Agriculture) केवळ एका हेक्टरमधून तुम्ही एका वर्षात सुमारे 4 लाख रुपयांचा नफा कमवू शकता.

Updated on 13 January, 2022 10:11 PM IST

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक नवी कल्पना देत आहोत. हा व्यवसाय तुम्ही माफक गुंतवणूक करून सुरू करू शकता. गवती चहाच्या शेतीचा (Lemon Grass Farming) व्यवसाय तुम्ही करू शकता. गवती चहाला 'लेमन ग्रास' (Lemon Grass) असंही म्हटलं जातं. या शेतीतून (Agriculture) केवळ एका हेक्टरमधून तुम्ही एका वर्षात सुमारे 4 लाख रुपयांचा नफा कमवू शकता.

अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात

गवती चहापासून काढलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. यापासून काढलेलं तेल सौंदर्यप्रसाधनं, साबण, तेल आणि औषधं बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. त्याला बाजारात चांगला भाव मिळतो. या लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वनस्पती दुष्काळग्रस्त भागातही लावता येते. या शेतीमध्ये ना खताची गरज आहे ना वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस करण्याची भीती आहे. यामुळे हे पीक फायदेशीर ठरत आहे. पेरणीनंतर 5-6 वर्षं याचं पीक सतत चालू राहते.

हेही वाचा : सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी खुषखबर, बॅंकांकडून मिळणार वाढीव पीककर्ज

गवती चहाची लागवड सोपी, जाणून घ्या याविषयी

गवती चहा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ फेब्रुवारी ते जुलै दरम्यान आहे. एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा कापणी केली जाते. कापणी वर्षातून तीन ते चार वेळा केली जाते. गवती चहापासून तेल काढलं जातं. याच्या विक्रीचा दर 1,000 ते 1,500 रुपये लिटर आहे. त्याची पहिली कापणी लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी केली जाते.

गवती चहा तयार आहे की नाही, हे समजण्यासाठी त्याचे पान तोडून त्याचा वास घ्या. जर तुम्हाला लिंबासारखा तीव्र वास आला, तर गवती चहा कापणीसाठी तयार असल्याचे समजा. जमिनीपासून 5 ते 8 इंच वर कापणी करावी. याची उत्पादन क्षमता तीन वर्षांपर्यंत वाढते. गवती चहाची रोपवाटिका तयार करण्याचा उत्तम काळ म्हणजे मार्च-एप्रिल महिना.

English Summary: Even in drought-prone areas, lemon grass will earn Rs 4 lakh a year
Published on: 13 January 2022, 09:15 IST