News

अभिनेता प्रवीण तरडे नेहेमी चर्चेत असतो, त्यांचे अनेक चित्रपट देखील खूप गाजले आहेत. ते आपल्या शेतावर खूप प्रेम करतात. शेतात काम करत असतानाचे त्यांचे व्हिडिओ अनेकदा ते शेअर करत असतात. आता असाच एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

Updated on 21 August, 2022 1:42 PM IST

अभिनेता प्रवीण तरडे नेहेमी चर्चेत असतो, त्यांचे अनेक चित्रपट देखील खूप गाजले आहेत. ते आपल्या शेतावर खूप प्रेम करतात. शेतात काम करत असतानाचे त्यांचे व्हिडिओ अनेकदा ते शेअर करत असतात. आता असाच एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला बॅकग्राऊंड गाणं लावण्यात आले आहे. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओला कॅप्शन देखील दिले आहे. हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात… कारण आपल्या कित्येक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू, असं त्यांनी म्हटले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रवीण तरडे यांचे आपल्या गावावर, आपल्या शेतीवर असलेले प्रेम अनेकदा दिसून आले आहे. अनेकदा ते आपल्या शेतात रमलेले पाहायला मिळतात. त्यांचे चित्रपट देखील वास्तववादी असतात.

मोदींविरुद्ध केजरीवाल! आता 2024 मध्ये काँग्रेस नाही तर केजरीवाल यांच्यासोबत मुख्य लढत

आताही प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ खूप गाजत आहे. यामध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातात नांगर घेऊन भात शेतीची लागवड केली आहे. या व्हिडिओ प्रवीण तरडे स्वतः बैल जोडी घेऊन शेतात राबताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
झुकेगा नही साला!! दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या वाटेत, शेतकऱ्याने ते मागे सरकवले पण पाडले नाही..
काळजी मिटली! मंकीपॉक्स चाचणीसाठी पहिले स्वदेशी किट लाँच..
शेतकऱ्यांच्या जमिनीतील काळ सोनं!! शेतकऱ्यांनो काळ्या जमिनीत घ्या 'ही' पिके...

English Summary: Even if this mud touches the feet, it does not shake off the whole body because..
Published on: 21 August 2022, 01:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)