News

चिखली मेहकर राज्य महामार्गे 548 C ला जोडरस्ता असलेल्या गांगलगाव कोलारा हा गाव जोडरस्ता आहे.

Updated on 21 February, 2022 9:00 PM IST

चिखली मेहकर राज्य महामार्गे 548 C ला जोडरस्ता असलेल्या गांगलगाव कोलारा हा गाव जोडरस्ता आहे. सदर रस्ता हा गांगलगाव गावढाण जवळील 270 मीटर रस्ताला पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे.

पावसाळ्यात रस्ता चिखलमय होवून संपूर्ण गावासह गावाला बँक व शाळेसाठी येणा-या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो. या रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता रुंद व्हावा यासाठी

आज दि. २१ फेब्रुवारी पासुन वेळ १ वाजेपासून रस्ताच्या कडेला गावकऱ्यांनी

आमरण आंदोलनाला सुरुवात करण्यात झाली आहे. गावकऱ्यांश युवक प्रवर्ग आंदोलनात सहभागी आहे. याबाबद मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा,मा.तहसीलदार साहेब चिखली, यांना वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासनाला जाग येण्यासाठी गावक-यांनी आंदोलनाच्ची पवित्रा हाती घेतली आहे.

लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला जाग यावी आणी प्रशासनाने या रस्ताची दैयनिय अवस्था झाली आहे. 

त्याची तात्काळ दखल घ्यावी.

यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले आहे.

इ. सन १९६० ते १९६८ या रस्त्यावर २७० मिटर चे काम कायम रखडलेले आहे. म्हणून गावकऱ्यांना आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहिला नाही.

यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक गणेश म्हस्के,नितीन म्हस्के,गजेंद्र म्हस्के,राजेंद्र म्हस्के व ऋषिकेश म्हस्के आणि प्रल्हाद म्हस्के,सुनील म्हस्के यासह २०० च्या वर ग्रामस्थ उपस्थित होते.

आज दि. २१ फेब्रुवारी पासुन वेळ १ वाजेपासून रस्ताच्या कडेला गावकऱ्यांनी आमरण आंदोलनाला सुरुवात करण्यात झाली आहे. गावकऱ्यांश युवक प्रवर्ग आंदोलनात सहभागी आहे. याबाबद मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा,मा.तहसीलदार साहेब चिखली, यांना वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासनाला जाग येण्यासाठी गावक-यांनी आंदोलनाच्ची पवित्रा हाती घेतली आहे.

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Even if death comes, it will work, but now there is no turning back - villager Gangalgaon
Published on: 21 February 2022, 09:00 IST