बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे भीषण पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आलेल्या पूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आज शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील कालखेड फाटा, पहूरपूर्णा, अकोला फाटा, दुर्गादैत्य, काथरखेड, पिंप्री, एकलारा, बावनबिर यांसह अन्य गावात भेटी देवून पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
अचानक आलेल्या पूरामुळे अनेक ठिकाणी घरे वाहून गेली आहेत, पशूधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनीच्या-जमिनी खरडून गेल्या आहेत. घरे व घरातील साहित्य वाहून गेल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत, तर अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी या पूरात वाहून गेली आहे. प्रचंड असे नुकसान झाल्याने लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. पुरामध्ये वाहून गेल्याने एकलारा येथील मधुकर पांडुरंग धुळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देवून कुटूंबियांचे सांत्वन केले. ज्यांचे घरे वाहून गेली त्यांचे शाळेमध्ये स्थलांतर केले आहे, त्यांच्याशीही संवाद साधून आधार दिला.
ऊस तोडणी यंत्र वापरातील आव्हाने
यावेळी प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याची विनंती केली. नागरिकांशी संवाद साधतांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठे व आक्रमक आंदोलन उभे करण्याचा शब्द दिला.
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
नुकसान होवून 48 तास झाले तरी पालकमंत्र्यांनी पाहणी सुद्धा केली नाही, सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे. सरकारनेही तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा या नुकसानग्रस्त नागरिकांच्या रोषाला सरकारला समोरे जावे लागेल.
जावं तिथं फक्त अश्रूंचा बांध फुटतोय..! नि:शब्द झालोय..!
दुधाला 34 रुपये दराचा शासनाचा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार! राजू शेट्टी यांनी थेट फसवणुकीचे उदाहरणच दिले
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या ग्राफिक्स वरील वक्तव्यावर खुलासा, राजू शेट्टी यांना केला फोन, आणि...
Published on: 26 July 2023, 10:09 IST