News

यंदाच्या हंगामात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे जे की साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे मात्र त्याचप्रकारे राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. जरी ऊस क्षेत्रात आणि साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम स्थानी असला तरी अतिरिक्त ऊस हा चिंतेचा विषय आहे. कधी न्हवे आता मराठवड्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे जे की या भागात अतिरिक्त उसाचा कायमचा प्रश्न राहिलेला आहे. यंदा ३१ मे पर्यंत साखर कारखाने चालू ठेवण्यास साखर आयुक्त कार्यालयाने आदेश दिले आहेत. एवढे सर्व असूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागतोय की नाही अशी शंका मनात राहिली आहे. ऊस लागवड होऊन १५ महिने जरी उलटले तरी सुद्धा अजून काही ठिकाणी ऊस फडातच आहे.

Updated on 22 March, 2022 5:41 PM IST

कालावधी नाही तर गाळप प्रक्रिया वाढणे गरजेचे :-

सध्या ऊस गाळपचा कालावधी वाढवला आहे मात्र ऊस गाळपची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. ज्या भागातील गाळप पूर्ण झाले आहे त्या साखर कारखान्यांनी मराठवाडा विभागातील ऊसतोड करावी असा प्रस्ताव आ. राणाजगजितसिंह यांनी साखर आयुक्तांसमोर ठेवलेला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाली की अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे मात्र अजून कोणताही निर्णय झाला नाही. यंदाच्या हंगामात मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी वाढीव ऊस गाळप केले आहे. परंतु ऊस क्षेत्रात एवढी वाढ झाली आहे की ऊसतोड वेळेत करणे शक्य झाले नाही.

उत्पादन घटण्याचा धोका कायम :-

जरी ऊस गळपाची क्षमता वाढवली किंवा गाळपचा कालावधी जरी वाढवला तरी उत्पादन घट ही ठरलेली आहे. ऊस लागवड केल्यापासून १२ महिने झाले की ऊसतोड करणे गरजेचे आहे. जवळपास १५ महिने जरी उलटले तरी ऊसतोड झाली नाही त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. जरी ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी यंदा उसाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

प्रथमच 7 महिने गाळप हंगाम :-

यंदा २०२१ च्या ऑक्टोम्बर महिन्यात ऊस गाळपाला सुरुवात झाली होती. सर्वकाही व्यवस्थित चालू होते मात्र मध्ये अवकाळी पावसामुळे थोडा हंगाम थांबला गेला मात्र नंतर सुरू झाला. जवळपास ७ महिने झाले तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही जे की याबाबत शंका उपस्थित राहिलेला नाही. यंदा अतिरिक्त उसाचा परिणाम हा येणाऱ्या लागवडीवर होणार आहे असे वातावरण मराठवड्यात पाहायला भेटत आहे. जरी अशाच प्रकारे परिस्थिती राहिली तर उत्पादनात घट हे नक्की आहे.

English Summary: Even after 15 months, the cane is still cracking! Factories to be closed in the face of rains, everyone's attention on extra sugarcane
Published on: 22 March 2022, 05:40 IST