सध्या राज्यात सर्वत्र उन्हाच्या कडाक्यात प्रचंड वाढ झाली आहे. मराठवाड्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हात मोठी वाढ झाली असून यामुळे मराठवाड्यातील धरणात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे सांगितले जात आहे. मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात धरणातून वेगाने बाष्पीभवन सुरू झाले आहे मात्र असे असले तरी जायकवाडी धरणात होणारे बाष्पीभवन हे इतर धरणांच्या तुलनेत खूप अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जायकवाडी धरणातून अतिशय वेगाने बाष्पीभवन होत असून पाण्याच्या साठ्यात मोठी घट घडत असल्याचे नमूद केले गेले आहे. जायकवाडी धरणातून बाष्पीभवनाच्या पाणीतून सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले जाऊ शकते किंवा औरंगाबाद शहराला दहा दिवस पाणी पुरवले जाऊ शकते.
अर्थात औरंगाबाद शहराला लागणाऱ्या दररोजच्या पाण्यापेक्षा दहापट अधिक पाणी केवळ बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातून आटत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जायकवाडी धरणातून जर बाष्पीभवन होत असेल तर ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचे विशेषज्ञाकडून व्यक्त केले जात आहे. सध्या मराठवाड्यात 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान बघायला मिळत आहे, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ नमूद करण्यात आली आहे.
खरं पाहता, उन्हाळ्याची ही फक्त एक झाकी आहे आणि पिक्चर अजून खूप बाकी आहे त्यामुळे एप्रिल-मे आणि जुनचा पंधरवाड्यात जायकवाडी धरणातून किती पाणी बाष्पीभवमुळे कमी होईल याची फक्त कल्पनाच लोकांच्या काळजाचे ठोके चुकवायला पुरेसे आहेत. एकंदरीत जायकवाडी धरणातून होत असलेले पाण्याचे बाष्पीभवन संपूर्ण जनतेसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ शकते.
गत खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने मराठवाड्यातील जायकवाडी समवेतच इतर धरणे जवळपास हाउसफुल असल्याचे बघायला मिळाले होते मात्र आता धरणातून वेगाने होत असलेले बाष्पीभवन बघता ऐन उन्हाळ्यात मराठवाड्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी शंका व्यक्त केली जातं आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणात सध्या 71 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. उन्हाळी हंगाम प्रगतीपथावर असल्याने जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यातून सुमारे 1800 क्युसेक पाणी सोडले जात असून उजव्या कालव्यातून सुमारे 700 क्युसेक पाणी सोडले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जायकवाडी धरणातून रोजाना 1.479 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन नमूद करण्यात आले आहे आणि औरंगाबाद शहरासाठी रोजाना 0.15 एवढेच पाणी लागत असते म्हणजेच औरंगाबाद शहरासाठी आवश्यक असलेल्या पाण्या पेक्षा दहापट अधिक पाण्याची जायकवाडी धरणातून रोजाना बाष्पीभवन होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे.
कडाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंग हिरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जायकवाडी धरणावर ठराविक रसायनाची फवारणी करून होत असलेले बाष्पीभवन बऱ्याच अंशी नियंत्रणात आणले जाऊ शकते मात्र, जायकवाडी धरणाचे क्षेत्र हे पक्षी अभयारण्य असल्याने केमिकल ची फवारणी केली जाऊ शकत नाही.
केमिकल फवारल्यामुळे पक्षी अभयारण्यातील प्राण्यांना धोका पोहोचू शकतो त्यामुळे जायकवाडी धरणावर बाष्पीभवन थांबवण्यासाठी कुठल्याच प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करणे अशक्य आहे. एकंदरीत जायकवाडी धरणातून जर याच पद्धतीने बाष्पीभवन होत राहिले तर भविष्यात औरंगाबाद शहर समवेतच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
Published on: 21 March 2022, 06:18 IST