News

इंधनच्या आयातीवरील अवलंबित्तव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे. परिणामी देशातल्या साखर क्षेत्रातून इथेनॉलचा पुरवठा वाढण्याचा अंदाज आहे. कारण जानेवारीपासून दर महिन्याला 4 ते 5 नवे आसवणी प्रकल्प किंवा प्रकल्पांचा विस्तार करण्याचा साखर कारखान्यांचा मानस आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून इथेनॉल खरेदीची गती वाढवण्याचीही शक्यता आहे.

Updated on 26 January, 2022 8:43 PM IST

इंधनच्या आयातीवरील अवलंबित्तव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे.  परिणामी देशातल्या साखर क्षेत्रातून इथेनॉलचा पुरवठा  वाढण्याचा अंदाज आहे. कारण जानेवारीपासून दर महिन्याला 4 ते 5 नवे आसवणी प्रकल्प किंवा प्रकल्पांचा विस्तार करण्याचा साखर कारखान्यांचा मानस आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून इथेनॉल खरेदीची गती वाढवण्याचीही शक्यता आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल कार्यक्रमांतर्गत 2021-22 मध्ये सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी 459 कोटी लिटीर इथेनॉल पुरवठ्याासाठी निविदा काढल्या आहेत.

यापैकी 16 जानेवारीपर्यंत 369.4 कोटी लिटरसाठीचे इरादा पत्र काढण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांकडून इथेनॉलला मागणी असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अतिरिक्त ऊस आणि साखरेचे उत्पादन इथेनॉलकडे वळते केल्यास साखर कारखान्यांना आर्थिक पाठबळ मिळू शकते.त्यादृष्टीने महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मितीचा ब्राझील पॅटर्न राबवण्याासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

साखर कारखान्यांकडून इथेनॉलचा पुरवठा सुरू झाला असून  ऑईल मार्केटिंग कंपन्यांना 16 जानेवारीपर्यंत 49.4 कोटी लिटर इथेनॉल प्राप्त झाले आहेत. असे एका अधिकाऱ्याने बिझनेस लाईन या इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. आम्ही चालू हंगामात 1 डिसेंबरपासून आतापर्यंत सुमारे 8.6 टक्के लक्ष्य गाठले असून खरेदीची गती आणखी सुधारण्याची अपेक्षा करकतो, असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले.

 

चालू गाळप हंगामासाठी पुढील पंधरवड्यात साखर कारखान्यांना उसाची उपब्धता चांगली राहण्याची अपेक्षा असल्याचे ही ते म्हणाले. जानेवारी महिन्यपासून दर महिन्याला 4.5 नवे आसवणी प्रकल्प सुरू होतील. यामध्ये  काही प्रकल्पांच्या विस्ताराचाही समावेश आहे, असे वर्मा यांनी म्हटले आहे.

English Summary: Ethanol supply is expected to increase this season, with demand expected to increase
Published on: 26 January 2022, 08:43 IST