News

भारत सरकार इथेनॉल उत्पादनाला भरपूर प्रोत्साहन देत आहे. जेणेकरून बाहेरून आयात होणाऱ्या पेट्रोल कमी आयात होईल. पेट्रोलचे दर कमाई होतील. सर्वसामान्यांची महागाईतून सुटका होईल.

Updated on 05 February, 2022 5:28 PM IST

भारत सरकार इथेनॉल उत्पादनाला भरपूर प्रोत्साहन देत आहे. जेणेकरून बाहेरून आयात होणाऱ्या पेट्रोल कमी आयात होईल. पेट्रोलचे दर कमाई होतील. सर्वसामान्यांची महागाईतून सुटका होईल. देशाबाहेर जाणारा पैसा फक्त देशातील शेतकऱ्यांनाच मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल.

सरकारच्या या प्रयत्नाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 2018-19 ते 2020-21 पर्यंत म्हणजेच गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशने विक्रमी 13 लाख 20 हजार 400 किलो लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे.

त्याचवेळी महाराष्ट्रात 9 लाख 11 हजार 800 किलो लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे, ज्याचा वापर इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून विकले जाते. सध्या पेट्रोलमध्ये फक्त 10 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 1 एप्रिल 2023 पासून सरकार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या तयारीत आहे. 2021-22 मध्ये देशात 29 लाख 55 हजार 400 किलो लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.

इथेनॉलचे फायदे

१. इथेनॉलचा अधिकाधिक उपयोग केल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यांचे उत्पन्न वाढेल.

२. इथेनॉल ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून बनविला जातो.

३. साखर कारखानदारांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळेल. ज्यामधून त्यांचे शेतीतील थकबाकी परतफेड करण्यात ते सक्षम होतील.

४. इथेनॉल हे खूपच किफायतशीर आहे. त्यामुळे ग्राहकांनाही पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासून थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

English Summary: Ethanol production increased in 3 years; Sugarcane growers will benefit
Published on: 05 February 2022, 05:27 IST