शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 'साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करण्याची मागणी केली आहे. तसेच इथेनॅालच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.
तसेच सांगली कोल्हापूर बायपास मार्गे चौपदरीकरण करताना मुरमाचा भराव टाकू नये, अन्यथा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावे महापुराच्या पूर्ण विळख्यात जातील. त्यामुळे सदर रस्ता करताना पिलरचा वापर करून रस्ता करावा, अशी मागणी देखील यावेळी केली.
नितिन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन साखर उद्योगाबरोबर, राष्ट्रीय महामार्गांचे सुरू असलेली कामे व राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.
राज्यात सरकारी वाळूची ६५ डेपोची उभारणी, ऑनलाईन खरेदी करता येणार वाळू...
देशामध्ये ऊस उत्पादक शेतकरी वगळता केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस, कांदा, धान उत्पादक शेतक-यांसह सर्व शेतकरी संकटात आर्थिक संकटात सापडले आहेत. नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नामुळे केंद्र सरकारने इथेनॅालचे धोरण स्थिर केल्यामुळे साखर कारखानदारांना थोडे चांगले दिवस आले आहेत.
वाढलेल्या महागाईमुळे उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेली असून यंदा एफ.आर. पी पेक्षा वाढीव दर दिल्याशिवाय हा उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे. याकरिता साखरेचा बाजारातील किमान दर ३८ रूपये करून साखर निर्यात धोरण निश्चित करण्याची गरज आहे.
देशात पामतेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. याचा विपरीत परिणाम सोयाबिनच्या दरावर होत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या सोयाबिन उत्पादीत होत असलेल्या भागात होत आहेत. तसेच सोयाबिनच्या पेंडीच्या आयातीवर देखील निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.
लम्पी व्हायरसने अहमदनगरमध्ये 43 गुरांचा मृत्यू, राज्यात उडाली खळबळ..
याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी - कोल्हापूर ते अंकली व पुणे- कागल या महामार्गातील रस्त्याच्या कामातील त्रुटीबाबत व सुरू होत असलेल्या कामामुळे संभाव्य महापुराच्या परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा केली.
तसेच अंकली कोल्हापूर बायपास मार्गे चौपदरीकरण करताना भराव न टाकता पिलर उभे करून रस्ते तयार केले जातील, असेही त्यांनी आश्वासन दिले. यावेळी संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.
'साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करा'
सरकारी नोकरी सोडून कोरफडीची शेती सुरु, आता कोटींमध्ये उलाढाल..
Published on: 19 August 2023, 10:49 IST