News

मुंबई: कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची निकड लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

Updated on 01 December, 2018 8:33 AM IST


मुंबई:
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची निकड लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

श्री. खोत पुढे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन सन 2017-18 मध्ये घोषणा केल्यानुसार यवतमाळ येथे शासकीय कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जमिनीची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्याच वेळी इथे पारंपरिक अभ्यासक्रम सुरु न करता नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून अद्ययावत अभ्यासक्रमासाठीचा प्रस्ताव मागविण्यात आला. या उपसमितीने दिलेल्या प्रस्तावानुसार शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.

English Summary: Establishment of Government Food Science Degree College at Yavatmal
Published on: 01 December 2018, 08:32 IST