सध्या शेतीमध्ये पिकांवर होणारा विविध कीटकांचा हल्ला तसेच पसरणारे विविध प्रकारचे रोग त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकरी किटकनाशकांची फवारणी करत असतात. त्यामुळे अशा रोग आटोक्यात येऊन उत्पादनात वाढ होते.
सध्या शेतीमध्ये पिकांवर होणारा विविध कीटकांचा हल्ला तसेच पसरणारे विविध प्रकारचे रोग त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकरी किटकनाशकांची फवारणी करत असतात. त्यामुळे अशा रोग आटोक्यात येऊन उत्पादनात वाढ होते. या सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचे विभागीय कार्यालय हे ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर,कोल्हापूर, लातूर,औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून सेंद्रिय शेतीकरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असूनयेणाऱ्या काही वर्षात हे प्रमाण वाढू शकते. सध्या या सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण हे खासगी संस्थाच्या माध्यमातून करण्यात येते. अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळेत्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.सध्या भारतातउत्पादित सेंद्रिय शेतमालाला प्रमाणीकरण करण्याचे काम नॅशनल प्रोग्रम फोर ऑर्गानिक प्रोडक्शन च्यासूचनांनुसार चालत असून याबाबत उत्पादनांना प्रमाणीकरण देणाऱ्या संस्थांना मान्यता देण्याचे काम राष्ट्रीय प्रमाणीकरण मंडळ आणि अपेडा यांच्या अंतर्गत चालते.
ही मानके युरोपियन कमिशन, युनायटेड नेशन्स ड्रग्सएजन्सी या आंतरराष्ट्रीय संस्था आणि फुड सिक्युरिटी स्टॅंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया च्या मानकांची सुसंगत आहेत. यामुळेच कृषी उत्पादनांच्या निर्यातीत सेंद्रिय शेती मालाला प्रोत्साहन मिळावे व शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा खेळता रहावा यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांनी सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण करून घेण्याचे निकष लागू केले आहेत.
Published on: 04 September 2021, 12:24 IST