लॉकडाऊन दरम्यान शेतीच्या कामे आणि शेतकऱ्यांची कामांना प्रथम प्राधान्य द्या , अशा सुचना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केंद्र सरकार आणि राज्यांना दिल्या आहेत. या काळात शेतीच्या कामांसाठी होणारी वाहतूक कोणत्याही अडथळे आणता सुरळीत चालू द्यावी, असा सल्ला नायडू यांनी दिला आहे. उपराष्ट्रपती भवनमध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी बोलताना नायडू यांनी हा सल्ला दिला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला असून या काळात कृषी क्षेत्राला बाधा पोहोचू, नये यासाठी कृषी मंत्रलयाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुकही उपराष्ट्रपती नायडू यांनी केले आहे.
कृषी उत्पादक हे संघटित नसतात, त्यामुळे त्याचे विचार आपणांस ऐकू येत नाही. यामुळे त्याच्या हिताचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे प्रामुख्याने राज्यांचे काम असले तरी केंद्राने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले. फळे व भाजीपाला यासारख्या नाशवंत कृषी उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, नाशवंत वस्तूंच्या साठवण विपणनावर विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणासही मंडईत जाण्य़ास भाग पाडले जाऊ नये, म्हणून थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करता यावा यासाठी एपीएमसी कायद्यानुसार खरेदी करावी. यामुळे ग्राहकांना फळ, भाजीपाला व इतर शेतमालाची पुरेशी उपलब्धता होण्यास मदत होईल, असे नायडू म्हणाले.
याबरोबर शेतमालाच्या वाहतुकीवर जोर देताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कृषी उत्पादकांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, यांची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. आता खरीप हंगाम येत आहे, यावर विशेष लक्ष द्यावे आणि शेतीच्या कामांना लागणाऱ्या साधनांची ने-आण करण्यासही परवानगी द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उचलेल्या उपायांची सविस्तर माहिती दिली. केंद्रीय कृषी मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची घनिष्ठ समन्वयाने काम करत आहे. या संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असे आश्वासन तोमर यांनी उपराष्ट्रपतींना दिले.
Published on: 18 April 2020, 08:06 IST