News

लागवड केलेल्या पिकातुन उत्पन्न घेण्यापेक्षा पिकाचे संरक्षण करणे खूप गरजेचे झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली प्राण्यांपासून शेती पिकाचे संरक्षण करणे खूप गरजेचे बनले आहे.कारण जंगली प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस हा वाढतच चालला आहे. त्यामुळे हंगामी पीकाच उत्पादन हे घ्यावे की नाही अश्या वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.

Updated on 26 October, 2021 5:10 PM IST

लागवड केलेल्या पिकातुन उत्पन्न घेण्यापेक्षा पिकाचे संरक्षण करणे खूप गरजेचे झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली प्राण्यांपासून शेती (farming) पिकाचे  संरक्षण  करणे  खूप  गरजेचे बनले आहे.कारण जंगली प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस हा वाढतच चालला आहे. त्यामुळे हंगामी पीकाच उत्पादन हे घ्यावे  की  नाही अश्या  वेगवेगळे  प्रश्न  शेतकऱ्यांसमोर   उभे   राहिले आहेत.वाढत्या उपद्रव्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे मार्गे अवलंबले पाहिजेत नाही तर संपूर्ण पिकाचे नुकसान होईल.

पिकाभोवती रंगीबेरंगी साड्या बांधणे:-

ही एक जुनी पद्धत आहे. या मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साड्या या पिकाभोवती बांधल्या जातात. रंगीबेरंगी साड्यांमुळे रानडुकरं ला तिथे नेहमी हालचाली दिसतात त्यामुळं त्या ठिकाणी यायला रानडुकरं भितात. या पद्धतीने कमीत।कमी शेतातील 40 ते 50।टक्के होणारे नुकसान आपण वाचवू शकतो.

 मानवी केस रानात विस्कटणे:-

लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी हा उपाय करतात. हा उपाय सर्वात कमी खर्चिक आहे. जिथे रानडुकरे येतात तिथं मानवी केस विस्कटावे.रानडुकरे श्रवण आणि दृष्टी ही  दोन्ही  पण  कमजोर असते त्यामुळं वास घेत अन्नाच्या शोधत आलेली रानडुकरे रानात येतात आणि ते मानवी केस।त्यांच्या श्वसन नलिकेत अटकतात. व सैरावैरा धावू लागतात. हा उपाय सर्वात वेगळा असला तरी सर्वात फायदेशीर आणि उपयोगी आहे.

गौऱ्या पासून धूर तयार करणे:-

स्थानिक डुकरांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गौऱ्या मातीच्या भांड्यात जाळून त्याचा धूर पसरून सुद्धा रानडुकरांना पळवले जाते . या पद्धतीने रानात धूर पसरवून रानडुकरांना रानातून पळवले जाते. जर रानडुकरांना हा वास आला तर त्यांना अगोदर तिथं कोणी असल्याचा अंदाज येतो आणि भितीमुळे रानडुकरे रानात येत नाहीत.


 रानात वेगवेगळे आवाज तयार करने:-

रानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तयार करून सुद्धा रानडुकराना पळवले जाऊ शकते. यामध्ये रानात फटाके फोडणे, रानात जाळ करणे किंवा आग लावणे, तसेच जोरात ओरडणे यांचा वापर करून डुकरांना आपण पळवुन लावू शकतो आणि पिकाचे संरक्षण करू शकतो.

कुत्र्यांचा वापर:-

स्थानिक लोक रानडुकरं आणि वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कुत्र्यांचा वापर करतात. सर्वात जास्त शेतकरी हे या पद्धतीचा अवलंब करून।पिकांचे संरक्षण करत आहेत.

English Summary: Endanger crops with wild animals and wild boars, thus protecting the crop
Published on: 26 October 2021, 05:10 IST