News

कृषी क्षेत्रात योग्य तो निर्णय घेण्यासाठी वेळेवर योग्य ती माहिती मिळणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या अविष्काराने जलद माहिती मिळवण्यासाठी व तीचे आदान प्रदान करण्यासाठी सोय सहज लाभ अनेक एजन्सीस देत असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोबाईलफोनचा वाढत्या वापराने सरकारी विभाग, संस्था व खासगी संस्थांनी वेगवेगळी अॅप विकसीत केली आहेत. असंख्य मोबाईल अॅप शेतकऱ्यांच्या गरजांसाठी विकसीत केली जात आहेत.

Updated on 27 November, 2021 10:20 PM IST

कृषी क्षेत्रात योग्य तो निर्णय घेण्यासाठी वेळेवर योग्य ती माहिती मिळणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. माहिती  व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या अविष्काराने जलद माहिती मिळवण्यासाठी व तीचे आदान प्रदान करण्यासाठी सोय सहज लाभ अनेक एजन्सीस देत असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोबाईलफोनचा वाढत्या वापराने सरकारी विभाग, संस्था व खासगी संस्थांनी वेगवेगळी अॅप विकसीत केली आहेत. असंख्य मोबाईल अॅप शेतकऱ्यांच्या गरजांसाठी विकसीत केली जात आहेत.

शेतकऱयांकडून अशा अॅपचा वापर शेती उत्पादनांचे बाजार भाव, हवामान पीक संरक्षण व इतर सल्ला सेवेसाठी होताना दिसत आहे. वाढत असलेल्या मोबाईल अॅपच्या संख्येत आपण नेमकी व उपयुक्त मोबाईल अॅप कोणते याची माहिती घेणे गरजेचे आहे. यामुळे शेतक्यांना निविष्ठा, उत्पादन प्रक्रिया पणन संबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.

भारताच्या जीडीपी मध्ये शेती व संलग्न मत्स्य व्यवसाय आणि वणीकरण यांचा मोठा सहभाग आहे. भारतातील एकूण 58 टक्के ग्रामीण जनता शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानातील क्षमता शेतकऱ्यांना माहिती मिळवून देण्यात व तीचे आदान प्रदान करण्यात अधिक स्पष्ट होत असते. ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या 32 टक्के लोक इंटरनेट सुविधेचा वापर करीत आहे व भविष्यात शहरीभागापेक्षा ही संख्या वाढणार असल्याचे एक अभ्यासात दिसून आले आहे.

मोबाईल अॅप

मोबाईल अॅप्लीकेसन ही एक मोबाईल वरील अज्ञावली अॅप आहे की, जी विशिष्ट माहिती पूरविण्यासाठी तयार केलेली प्रणाली आहे. त्याद्वारे माहिती बरोबरच पैशाची देवाण-घेवाण, संदेश पाठविणे इत्यादी कामे केली जातात. अशी अॅप प्ले स्टोअर या विशिष्ठ अॅप्लीकेशन वरुन डाऊनलोड केली जातात. यासाठी इंटरनेट सुविधेचा वापर करावा लागतो.

मोबाईल अॅपचे फायदे

  • विशिष्ठ प्रकारची माहिती देण्यासाठीच बनवलेली असतात.
  • अगदी सहजपणे माहिती मिळविण्याची सोय केलेली असते.
  • अँड्राईड मोबाईलची आवश्यकता अनिवार्य असते.
  • मोबाईलवर माहिती साठविता येते व ती पुढे वापरली जाऊ शकते उदा. उत्पादनाची तांत्रिक माहिती, पीक संरक्षण, विविध योजनांची माहिती इ.
  • काही माहिती बदलत राहते त्यासाठी अद्यावत माहिती मिळविता येते उदा. हवामान, बाजार, भाव, सल्ला सेवा इत्यादी.
  • अॅपद्वारे किडी व रोगांची ओळख करणे व त्याद्वारे त्यांचे उगम विषयी माहिती व त्याचे प्रभावी नियंत्रण शक्य होते.
  • हवामान विषयी आगाऊ माहिती मिळाल्याने पिकांचे सरंक्षण, जनावरांचे संरक्षण, काढणी साठवणूक, माल बाजारातील पाठविणे इत्यादी संबंधी निर्णय क्षमता वाढते.
  • निविष्ठांच्या योग्य किमती काय आहेत त्याचे मुख्य स्त्रोत काय आहेत इत्यादी संबंधी माहिती समजते.
  • पिकासाठी रासायनिक खतांच्या विविध मात्रा, त्यांचे वेगवेगळे खत उपलब्धतेनुसार विशिष्ठ अन्नद्रव्याची मात्रा मिश्रणांद्वारे प्राप्त करणे.
  • आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ञ, अनुभवी किंवा प्रगतशील शेतकरी यांचेशी संपर्क करू शकतो.
  • आपल्या समस्यांचे फोटो, व्हिडिओ तज्ञांना दाखवून सल्ला सेवा मिळवणे.
  • शेत मालाची साठवण, तारण ठेवणे, बाजाराशी सांगड घालून व्यापाऱ्यांना विक्री करणे अशा अनेक कारणांसाठी मोबाईल अॅपचा वापर आपणास करता येऊ शकतो.

यातील काही माबाईल अॅप खालीलप्रमाणे

  • किसान सुविधा - हवामान, बाजार भाव, सल्ला सेवा मृदा आरोग्य पत्रिका, पीक संरक्षण
  • पुसा कृषी - भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नवीन वाणांची, स्त्रोतांचे जतन करुन लागवड पद्धती, शेतीचे यांत्रिकरण, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान इत्यादी. शेतकऱ्यांना यावरुन आपली मते अनुभव पाठवता येतात.
  • सॉईल हेल्थ कार्ड - केंद्र सरकारद्वारे संचलित केले जात असून याव्दारे जमिनितील अन्नद्रव्यांचे प्रमाण  व त्या आधारे सल्ला दिला जातो.
  • क्रॉप इन्शुरन्स - पीक विमा संबंधी माहिती हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध
  • शेतकरी मासिक - शेती विषयक लेख मराठीतून वाचण्यासाठी उपलब्ध.
  • डिजिटल मंडी भारत - तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजार समितीचे शेतमालेच दर.

 

  • अॅग्री मार्केट - 50 किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजार भाव व दर दर्शविले जातात.
  • पशु पोषण - जनावरांचे विषयक मार्गदर्शन.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन- मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापन माहिती.
  • हळद लागवड- हळद लागवड प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती.
  • इफको किसान - हवामान, बाजार समिती दर, सल्ला, बातम्या, ज्ञान, भांडार
  • पीक पोषण - अन्नद्रव्ये, कमतरेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादी.
  • शेकरू  - कृषी योजना, प्रदर्शने , प्रशिक्षण इत्यादी बाबत माहिती.
  • सोलापूर अनार - डाळींब उत्पादन विषयक माहिती.
  • अक्यु बेदर  - हवामानविषयक अद्यायावत माहिती.

अशाप्रकारे शेतीच्या विविध गरजा पूरविणारे असंख्य अॅप उपलब्ध आहे. यात सरकारी व खासगी संस्थांनी आपआपल्या कार्याशी निगडीत मोबाईल अॅप विकसीत केली आहेत. याचा वापर करताना स्थानिक परिस्थिती व अॅपवरील माहिती यांची सांगड घालून व माहितीची खातरजमा करुन निर्णय प्रक्रिया राबविल्यास या सेवेचा उपयोग निश्चिताच होईल.

English Summary: Empowering farmers through mobile app
Published on: 27 November 2021, 10:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)