सर्वच क्षेत्रात महागाईने डोके वर काढले असून पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या पंक्तीत आता वीजदेखील येऊन बसली आहे. राज्यातील शेतकरी, औद्योगिक, घरगुती व व्यापारी तसेच अन्य सर्व ग्राहकांवर जुलै 2022 मध्ये मिळालेल्या विज बिलापासून पाच महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार च्या नावाखाली विविध आकाराच्या वीस टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर थकित इंधन समायोजन आकार 1226 कोटी रुपये, खाजगी वीज कंपनीचे थकीत देणे 7709 कोटी रुपये व समान करार असलेल्या रतन इंडियाचे देणे हा बोजा डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात येणार असल्याची दाट शक्यता असल्याकडे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व विजतज्ञ प्रताप होगाडे यांनी लक्ष वेधले.
नक्की वाचा:एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश
सरासरी 1.35 रुपये प्रतियुनिटने होणार महाग
मार्च ते एप्रिल या कालावधीसाठी चा किमान इंधन समायोजन आकार पाच पैसे प्रति युनिट तर कमाल 25 पैसे प्रतियुनिट इतका होता. यामध्ये जर पाच श्रेणीचा विचार केलास तर सरासरी दर हा दर 17 पैसे प्रतियुनिट होता.
मात्र हाच दर आता जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या वीज देयकासाठी सरासरी 1.35 पैसे प्रतियुनिट झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक घरगुती ग्राहकाचे वीज बिल देयक ऑक्टोबरपर्यंत सरासरी 1.35 रुपये प्रति युनिटने महागणार आहे.
Published on: 26 July 2022, 01:24 IST